शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: February 8, 2017 03:03 IST

शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती अनिल पांडुरंग बोरकर

सत्र न्यायालय : आरती बोरकर खून प्रकरण नागपूर : शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती अनिल पांडुरंग बोरकर यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी एका आरोपीने दाखल केलेला दोषमुक्त (डिस्चार्ज) करण्याचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. रवींद्र महादेवराव खंते, असे आरोपीचे नाव आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक तलाव परिसरातील लालगंज राऊत चौकात १ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरती बोरकर यांचा खून आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अनिल पांडुरंग बोरकर यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, आरती बोरकर आणि अनिल बोरकर यांनी नाईक तलाव परिसरात असलेला रवींद्र खंते आणि अनिता रवींद्र खंते यांचा रॉकेल व रेशन धान्य विक्रीचा व्यवसाय बंद पाडला होता. खंते दाम्पत्य हे बेकायदेशीर व्यवसाय करतात, अशा तक्रारी बोरकर दाम्पत्य करायचे. खंते यांचा रॉकेलचा डेपोही त्यांनी बंद पाडला होता. याशिवाय सुरेंद्र राधेश्याम केशरवानी, नरेंद्र राधेश्याम केशरवानी आणि सोनू नरेंद्र केशरवानी हे मिरची पावडरमध्ये भेसळ करतात, अशी तक्रार करून त्यांची मिरची पावडरची चक्कीही बोरकर दाम्पत्याने बंद पाडली होती. केशरवानी आणि खंते यांनी आपसात कट रचून बोरकर दाम्पत्याला ठार मारण्यासाठी आरोपी विशाल ऊर्फ शानू मोहनदास खरे, विक्की राजू खरे आणि आकाश कमलेश दोरखंडे यांना चार लाखांची सुपारी दिली होती. घटनेच्या दिवशी बोरकर दाम्पत्य हे आपल्या घरासमोर बोलत उभे असताना आरोपी आकाश, विक्की आणि विशाल, असे तिघे एमएच-३१-टीसी-४६० क्रमांकाच्या मॅस्ट्रोने आले होते. आकाशने धारदार शस्त्राने अनिल बोरकर यांच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. अनिता बोरकर या आपल्या पतीला वाचविण्यास धावल्या असता विक्कीने त्यांच्या छातीवर भोसकून त्यांचा जागीच खून केला होता. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोपी रवींद्र खंते याचा दोषमुक्तीची विनंती करणारा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. तो ग्राह्य ठरवून न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय निकोसे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)