शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणारे आरोपी शिक्षेलाच पात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 20:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा येथील आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : २० वर्षांचा सश्रम कारावास कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा येथील आहे.विनोद बाकू जाधव (२४) व सुनील राजू जाधव (२४) अशी आरोपींची नावे असून ते वडार झोपडपट्टी, आर्वी नाका, वर्धा येथील रहिवासी आहेत. पीडित मुलगी घटनेच्या वेळी १६ वर्षे वयाची होती. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. २६ सप्टेंबर २०१४ रोजी पहाटे ५.१५ च्या सुमारास ती गोडे मैदानाजवळ फुले तोडायला गेली होती. दरम्यान, आरोपींनी मुलीला पकडून मैदानात नेले व ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने स्वत:ची सुटका करण्याचे प्रयत्न केले होते, पण ती अपयशी राहिली. तिने लगेच कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी गुप्त माहितीवरून आरोपींना अटक करून ८ नोव्हेंबर २०१४ रोजी ओळख परेड घेतली. त्यात मुलीने पंचांसमक्ष दोन्ही आरोपींना ओळखले.सत्र न्यायालयाने आरोपींना २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपींचे अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे अ‍ॅड. एम. जे. खान यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार