शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी मुलास अटक

By admin | Updated: March 5, 2017 01:55 IST

वडिलांनी पैसे न दिल्याने संतापलेल्या मुलाने दगड व काठीने डोक्यावर वार करून वडिलांचा खून केला.

वडिलांचा केला खून : मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी नरखेड : वडिलांनी पैसे न दिल्याने संतापलेल्या मुलाने दगड व काठीने डोक्यावर वार करून वडिलांचा खून केला. यात फरार असलेल्या आरोपी मुलाला पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) रात्री ७.४४ वाजताच्या सुमारास गावालगतच्या टेकडीवर अटक केली. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (दि.७) पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थडीपवनी (पुनर्वसन) येथे बुधवारी (दि. १) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नितीन शंकरराव देहारे (३२, रा. थडीपवनी-पुनर्वसन, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव असून शंकरराव तुळशीराम देहारे (५४, रा. थडीपवनी-पुनर्वसन, ता. नरखेड) असे मृत वडिलांचे नाव आहे. नितीन हा आई-वडिलांपासून विभक्त राहायचा. त्याने वडिलांना पैसे मागितले. वडिलांनी पैसे न दिल्याने त्याने वाद घालत दगड व काठीने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर नितीनने घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे जलालखेडा पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, तो थडीपवनी (पुनर्वसन)लगतच्या नोखाईच्या टेकडीवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच टेकडी गाठून त्याला अटक केली. शनिवारी सकाळी त्याला नरखेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदर घटनेचा तपास ठाणेदार विजयकुमार तिवारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)