शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जरीपटका हत्याकांडातील आरोपी गजाआड

By admin | Updated: June 10, 2015 03:11 IST

कुख्यात गुंड जुम्मन अली मंजूर अली (वय ३२) याची हत्या ‘खुन का बदला खून’ या प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर : कुख्यात गुंड जुम्मन अली मंजूर अली (वय ३२) याची हत्या ‘खुन का बदला खून’ या प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुम्मनची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना जरीपटका पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर हा खुलासा झाला. शेख इमरान शेख अहेमद (वय २३) आणि शेख जावेद शेख शफी (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही डोबीनगर, मोमीनपुरा येथील रहिवासी असून, कबाडीचा व्यवसाय करतात. कुख्यात जुम्मन आणि त्याच्या साथीदारांनी २०११ मध्ये कलाम ऊर्फ कल्लू शेख तसेच कलीम शेख अहमद या दोघांची निर्घृण हत्या केली होती. अपघाताचा देखावा करण्यासाठी त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर (गार्डलाईन) टाकले होते. पोलिसांनी जुम्मन आणि त्याच्या १० साथीदारांना अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी जुम्मन गड्डीगोदाममधील गुंड साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुली करायचा, नंतर तो बकऱ्या खरेदी-विक्री करू लागला. जुम्मन अलीकडे एका जणासोबत जनावरे विकण्याचा धंदा करीत होता. त्याला दारू आणि जुगाराचेही व्यसन होते.आरोपी इमरान मृत कलीमचा भाऊ आहे तर जावेद कल्लूचा चुलतभाऊ आहे. दोघांच्याही भावांची हत्या झाल्यापासून ते कमालीचे व्यथित होते. बाहेरच्या गुंडांनी जुम्मनमुळेच कलीम आणि कल्लूचा गेम केल्याची सल इमरान आणि जावेदला होती. त्यामुळे या दोघांनी जुम्मनची हत्या करण्याचा कट वर्षभरापूर्वीच रचला होता. ते संधीची वाट बघत होते. त्यासाठी जवळपास दरदिवशीच ते जुम्मनवर नजर ठेवून राहायचे. दुसरीकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीतून चांगली रक्कम मिळत असल्यामुळे जुम्मन नेहमीच पाच-सात गुंड साथीदारांच्या घोळक्यात राहायचा. सोमवारीसुद्धा तो अशाच प्रकारे आपल्या साथीदारांच्या घोळक्यात शुक्रवारी सकाळपासून गड्डीगोदाममधील एका हॉटेलमध्ये दारू पीत बसला. दोन हजारांची दारू रिचवल्यानंतर त्याचे साथीदार एकेक करीत तेथून सटकले. जुम्मनला घराकडे जाणे जमले नाही. त्यामुळे तो पंजाबी लाईन, भेसासूर मैदान रेल्वे लाईनजवळच्या एका झाडाखाली गेला आणि शर्ट काढून तेथेच झोपला. आरोपी इमरानची जमवाजमवआरोपी इमरानने हे सर्व बघितले. त्याने लगेच जावेदला फोन केला. शस्त्रासाठीही धावपळ केली. जावेद आल्यानंतर दुपारी १.३० च्या सुमारास हे दोघे जुम्मनजवळ गेले. त्याला शिवीगाळ, मारहाण केली. अतिदारू पिल्यामुळे जुम्मन प्रतिकार अथवा कोणत्याही विरोधाच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे आरोपींनी त्याचा गळा कापला. दुपारी २.३० च्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून दिसल्याने एकाने पोलिसांना कळविले. त्यानंतर जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)