शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती

By admin | Updated: February 12, 2017 02:21 IST

मानकापूर परिसरात मोहित पीटर या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रे आणि शांतिनगर

गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी : वसीम चिऱ्या व सोमू शेंद्रेला अटक नागपूर : मानकापूर परिसरात मोहित पीटर या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रे आणि शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी याचा खुनातील आरोपी कुख्यात शेख वसीम शेख अफजल ऊर्फ चिऱ्या याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी दीड वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागले. शांतिनगर येथील वसीम ऊर्फ चिऱ्याचा जुना मित्र अनवर चांदीचा परिसरात दबदबा वाढत असल्याने २२ सप्टेंबर २०१५ रोजी अनवरने त्याचा खून केला. दारू पाजण्याच्या बहाण्याने त्याला कारमध्ये बसवून कळमना परिसरात नेले. तिथे त्याला भरपूर दारू पाजून इतर साथीदाराच्या मदतीने त्याच्या गळा कापून खून केला. तेव्हापासून तो फरार होता. शुक्रवारी रात्री आर्णी यवतमाळ येथील कमबल पोश बाबा दरगाह येथे वसीम येणार आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांच्या चमूने त्याला पकडले. दुसरी घटना २६ जून २०१५ रोजी मानकापूर परिसरात घडली. मार्टीननगर येथील मोहित पीटर हा आपल्या मामाच्या दुकानात नेहमीपमाणे बसला होता. आरोपी शुभम ऊर्फ सोमू गौतम शेंद्रेने साथीदारांच्या मदतीने भरदुपारी मोहितचा खून केला होता. तेव्हापासून तो फरार होता. आरोपी शुभम हा अजनीतील कौशल्यानगर कुकडे ले-आऊट येथील राहणारा आहे. मृत मोहित हा अजनीतील एका भूखंड माफिया टोळीसाठी काम करीत होता. परंतु काही दिवसांपासून तो या टोळीवर वर्चस्व गाजवू लागला होता. त्यामुळे अजनीतील एक कुख्यात गुन्हेगाराशी संबंधित व्यक्तीला मोहितच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचीही चर्चा होती. आरोपी शुभम हा कुकडे ले-आऊट येथील घरी गुरुवारी रात्री येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारावर पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड, पीएसआय सचिन लुले, हवालदार बट्टुलाल, प्रकाश वानखेडे यांच्या चमूुने शुक्रवारी सकाळी ५ वाजता शुभमला त्याच्या घरातून अटक केली. (प्रतिनिधी)