शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपींना थेट ‘एमसीआर’

By admin | Updated: October 11, 2015 03:23 IST

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथील नबाब अन्वर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी ...

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथील नबाब अन्वर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने (जेएमएफसी) दोन आरोपींना थेट सुनावलेला न्यायालयीन कोठडी रिमांड अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने रद्द करून दोन्ही आरोपींना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शेख वसीम ऊर्फ छोटा वसीम (२५) आणि बासीद पटेल दोन्ही रा. शांतिनगर, अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही शेख वसीम ऊर्फ चिऱ्या शेख अफझल याच्या टोळीतील सदस्य आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने २८ एप्रिल २०१५ रोजी शेख वसीम ऊर्फ चिऱ्या याच्यासह टोळीतील सर्व पंधरा आरोपी निर्दोष सुटले होते. शांतिनगर भागात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी शेख वसीम आणि तिरुपती भोगे यांच्या टोळ्यांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो. १७ आॅगस्ट २०१३ रोजी या दोन्ही टोळ्यांनी शांतिनगर भागात उच्छाद घालून एकमेकांवर गोळीबार आणि सशस्त्र हल्ला केला होता. त्यावेळी दोन्ही टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करून दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्यांना आणि सदस्यांना अटक करण्यात आली होती. शेख वसीम हा आपल्या टोळीसह निर्दोष सुटला परंतु भोगे आणि त्याची टोळी वेगवेगळ्या गुन्ह्यात अद्याप कारागृहात आहे. नबाब अन्वर हा तिरुपती भोगेच्या टोळीला आपल्या टोळीची माहिती देऊन स्वत:चे वर्चस्व निर्माण करीत असल्याच्या संशयावरून शेख वसीमच्या टोळीने त्याचे २२ सप्टेंबर रोजी शांतिनगर भागातून अपहरण करून कळमन्यातील पावनगाव शिवारात नेले होते. या ठिकाणी त्याचा खून करून कामठी भागातील एका कालव्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. २७ रोजी मृतदेह आढळला होता. कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची सुरुवात शांतिनगर येथून प्रारंभ होत असल्याने प्रकरण लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी लकडगंज पोलिसांनी या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते आणि पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. परंतु ती नामंजूर करण्यात आली होती. त्यामुळे सरकार पक्षाने सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दखल केला होता. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनिता खोब्रागडे यांनी काम पाहिले. एपीआय धनराज नीळे आणि फौजदार आनलदास हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)