शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने प्रेयसीला ठार करून तिच्या पतीस केले गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:24 IST

प्रेयसी तिच्या पतीकडे जाणार असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रियकराने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला चढवला. यात पत्नी ठार झाली तर पती मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते लेआऊटमध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या एमआयडीसीतील पहाटेचा थरार

लोकमत न्यूज नेटर्वकनागपूर : प्रेयसी तिच्या पतीकडे जाणार असल्याचे लक्षात आल्यामुळे प्रियकराने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला चढवला. यात पत्नी ठार झाली तर पती मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते लेआऊटमध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.सीताश्वरी चंद्रकांत मडावी (वय २०) असे मृत महिलेचे नाव असून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या  तिच्या पतीचे नाव चंद्रकांत मडावी आहे. तो बालाघाटमधील रहिवासी आहे. सीताश्वरीचे आईवडीलही आधी बालाघाटमध्ये राहायचे. काही वर्षांपूर्वी ते रोजगाराच्या शोधात नागपुरात आले. सध्या ते दाते लेआऊटमध्ये एका बांधकामस्थळी राहतात. सीताश्वरी आणि चंद्रकांतचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांच्यात खटके उडू लागल्याने ती नागपूरला परत आली. येथे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा राजू पेंदूर काम करतो. त्यामुळे राजूचा भाऊ सचिन नेहमी येथे यायचा. त्यातून सचिनसोबत सीताश्वरीची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते तीन महिन्यांपूर्वी बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे पळून गेले. तेथे हे दोघे दोन महिने पती-पत्नीसारखे सोबत राहिले. त्यादरम्यान सचिन व्यसनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे तिला कळले. तो सारखा मारहाणही करायचा. त्यामुळे ती नागपूरला परत आली. तिच्या आईने तिच्या पहिल्या पतीची समजूत काढून त्याला बोलावून घेतले. त्यानेही मोठ्या मनाने सीताश्वरीला सोबत नेण्याचे कबुल केले. या पार्श्वभूमीवर, चंद्रकांत नागपुरात आला. हे सर्व सचिनला माहीत पडले. सीताश्वरी तिच्या पतीसोबत जाणार असल्याचे कळल्याने तो अस्वस्थ झाला. रविवारी रात्री चंद्रकांत आणि सीताश्वरी हे पती-पत्नीएकत्र एका झोपडीत झोपले. तर कुटुंबीय बाजूच्या झोपडीत होते. पहाटे ३च्या सुमारास सीताश्वरी आणि चंद्रकांतच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. बाजूच्या झोपड्यातून या दोघांचे नातेवाईक तसेच मजूर बाहेर आले तेव्हा आरोपी सचिन पळून गेला. त्याने सीताश्वरी आणि चंद्रकांतच्या डोक्यावर फावड्याने वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. सीताश्वरी जागीच गतप्राण झाली तर चंद्रकांतची अवस्था गंभीर होती. मजुरांनी त्याची माहिती एमआयडीसी ठाण्यात दिली. लगेच पोलिसांचा ताफा पोहचला. सीताश्वरीचा मृतदेह मेडिकलला पाठविण्यात आला. चंद्रकांतवर उपचार सुरू आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसी