शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी पतीला सात वर्षे कारावास

By admin | Updated: June 30, 2017 02:34 IST

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश

चारित्र्यावर संशय घेऊन छळ : पत्नीला केले आत्महत्येस प्रवृत्तलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने सात वर्षे साधा कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दादाराव नंदाराम गजबे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठविभाग येथील रहिवासी आहे. पुष्पकांता दादाराव गजबे (४०), असे मृत महिलेचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दादाराव हा कोणताही कामधंदा न करता दारू प्यायचा आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. मृत पुष्पकांता मात्र मजुरी करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करायची. घटनेच्या दिवशी २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. त्याने दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण केली होती. मुलीने त्याला हटकले असता त्याने तिचीही कॉलर पकडली होती. तू जहर पिऊन मरून जा, असे तो पत्नीला म्हणाला होता. त्यामुळे पुष्पकांताने स्वयंपाकखोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मुलगी स्वीटी दादाराव गजबे (१८) हिच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी दादारावविरुद्ध १ मे २०१६ रोजी भादंविच्या ४९८-अ आणि ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून २३ जून २०१६ रोजी त्याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी दादाराव गजबे याला भादंविच्या ४९८-अ कलमांतर्गत तीन वर्षे साधा कारावास, एक हजार रुपये दंड, भादंविच्या ३०६ कलमांतर्गत सात वर्षे साधा कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पुरुषोत्तम नारनवरे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार दिलीप कडू, रमेश भुसारी आणि हेड कॉन्स्टेबल किशोर ठाकूर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.