शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णालयातून पळाला आरोपी

By admin | Updated: September 4, 2015 02:43 IST

शासकीय मनोरुग्णालयातून बुधवारी रात्री बलात्काराचा आरोप असलेला एक कैदी शौचालयाची खिडकी तोडून पळून गेला. अखिल अहमद शेख असे फरार आरोपीचे नाव आहे.

नागपूर : शासकीय मनोरुग्णालयातून बुधवारी रात्री बलात्काराचा आरोप असलेला एक कैदी शौचालयाची खिडकी तोडून पळून गेला. अखिल अहमद शेख असे फरार आरोपीचे नाव आहे. तो भंडारा येथील रहिवासी आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी अखिल भंडारा येथील एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी आहे. मागील दोन वर्षांपासून तो भंडारा कारागृहात बंदिस्त होता. काही दिवसांपासून तो कारागृहात विचित्रपणे वागत होता. विक्षिप्त कृती करणे, बडबड करणे, नको ते चाळे करीत असल्याने त्याला १७ आॅगस्ट रोजी उपचारासाठी नागपुरातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोरुग्णालयातील क्रिमिनल वॉर्ड क्रमांक ११ मध्ये त्याला ठेवण्यात आले होते. या वॉर्डावर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस शिपाई २४ तास तैनात होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत बुधवारी रात्री आरोपी अखिल शौचालयातून खिडकी तोडून पळून गेला. विशेष म्हणजे, अनेक तास या गंभीर प्रकाराची कुणाला कुणकुणही नव्हती. आरोपी अखिल वॉर्डात नसल्याचे सकाळी ध्यानात आले. कर्मचाऱ्यांनी शौचालयाची पाहणी केली तेव्हा खिडकीतील सळाखी वाकलेल्या दिसल्या. त्यानंतर तो पळून गेल्याचे उघड झाले.(प्रतिनिधी)ओडिशात अटकया घटनेमुळे क्रिमिनल वॉर्डातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे एखादी व्यक्ती पळून जात असेल आणि सुरक्षा रक्षकांना त्याची तासन्तास माहितीच होत नसेल तर हे सुरक्षा रक्षक किंवा येथील सुरक्षा यंत्रणा किती दक्ष आहे, त्याचा प्रत्यय येतो. दरम्यान, रात्री उशिरा अखिलला ओडिशातील संभलपूरमध्ये पोलिसांनी अटक केली. प्रशासनाला हादराया घटनेमुळे मनोरुग्णालय प्रशासनाला मोठा हादरा बसला. त्याचप्रमाणे आरोपी अखिल हा खरेच मनोरुग्ण होता की तो तसे नाटक करीत होता, असा प्रश्न चर्चेला आला आहे. दरम्यान, आरोपी अखिल पळून गेल्याची माहितीवजा तक्रार रुग्णालय प्रशासनाने मानकापूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासासाठी श्वानही सोबत आणले. श्वानाने राजनगर झोपडपट्टीला लागून असलेल्या वॉर्ड नंबर १५-१६ पर्यंत मार्ग दाखवला. नंतर मात्र श्वान घुटमळू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षा भिंतीच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत अखिलचा रुग्णालयातील शर्ट सापडला. त्यामुळे तो येथून उघड्या अंगानेच पळून गेल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.