शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:08 IST

आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर : न्यायालयाचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी ...

आरोपी बागडेला २८ पर्यंत पीसीआर : न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी रवी ऊर्फ छोटू बागडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.

श्रीवास प्रकरण उघड झाल्यापासून बागडे फरार होता. तो गँगस्टर रणजित सफेलकर टोळीतील मुख्य गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मृत मनीष श्रीवास, छोटू बागडे आणि इशाक मस्ते हे तिघे खास मित्र होते. ते सफेलकर टोळीत सक्रिय होते. धोका निर्माण झाल्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला होता. त्यानुसार बागडेने ३ मार्च २०१२ ला रात्री मनीषला ''मस्त माल आणला आहे'', असे सांगून कारमध्ये बसवले. ते पवनगावच्या एका फार्म हाऊसवर गेले. तेथे रणजित सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो यांनी मनीषवर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दरीत फेकले. २०१२ च्या या हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी तब्बल ९ वर्षांनी केला. त्यात सफेलकरसह आतापावेतो सात जणांना अटक केली. छोटू बागडे मात्र फरार होता. रविवारी पहाटे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी युनिट तीनच्या पथकाकडून त्याला पाचपावलीत नाट्यमयरीत्या अटक केली. सोमवारी त्याला न्या. व. भ. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी केली. सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बागडेला २८ मे पर्यंत पीसीआर मंजूर केला.

---

आणखी गुन्हे उघड होणार ? सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांना पोलिसांनी वेगवेगळ्या तारखेला अटक केली. प्रत्येकाच्या चौकशीतून कोणता ना कोणता मोठा गंभीर गुन्हा उघड झाला. बागडेच्या पीसीआरमधूनही आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता पोलीस अधिकारी वर्तवित आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त बी. एन. नलावडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

---