शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 02:59 IST

यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध

हायकोर्टात जनहित याचिका : उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची विनंतीनागपूर : यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.अतुल जगताप असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते कंत्राटदार आहेत. एका जनहित याचिकेत त्यांनी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पातील गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील अर्थ वर्क सीसी लायनिंग व लेफ्ट बँक मेन कॅनलच्या बांधकामाचे कं त्राट बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. परंतु, कंपनीकडे अशा प्रकारची कामे करण्याची पात्रता नाही. कंपनीने खोटे व बनावट दस्तावेज सादर करून हे काम मिळविले आहे. कंपनीचे संचालक संदीप बजोरिया यांचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. कंपनीला हे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. कंपनीने या कामासाठी शासनाकडून आगाऊ रक्कम घेतली आहे. परंतु, ही रक्कम या कामावर खर्च न करता विधान परिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे होते. परंतु, ५ वर्षाचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. परिणामी शेतकरी आजही पाण्याची प्रतीक्षाच करीत आहेत. कंपनीचा घोटाळे करण्यात हातखंडा आहे. यामुळे कंपनीविरुद्ध आतापर्यंत अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी) अशा आहेत मागण्याबजोरिया कंपनीला मिळालेल्या विविध कंत्राटांची चौकशी करण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळणारे कंपनीचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, कंपनीला दिलेली कंत्राटे रद्द करून संबंधित कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, संबंधित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या, अशा याचिकाकर्त्याच्या मागण्या आहेत.जिगाव प्रकल्पात गैरव्यवहारअतुल जगताप यांनी दुसऱ्या याचिकेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकल्पाचे कामही बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. कंपनीने हे कंत्राटसुद्धा राजकीय बळाचा उपयोग करून मिळविले आहे. निविदेसोबत खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत असे जगताप यांचे म्हणणे आहे.राज्य शासनाला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी बुधवारी दोन्ही याचिकांवर सुनावणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, अमरावती जल संसाधन विभागाचे मुख्य अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अप्पर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, खामगाव येथील मुन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावून २० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, शासनातर्फे सहायक वकील नितीन रोडे यांनी बाजू मांडली.