शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण अन् बलात्काराचा आरोप

By admin | Updated: July 25, 2014 00:54 IST

पाच जणांनी आपल्याला कारमधून कळमेश्वरजवळ नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून एकाने बलात्कार केला तर, दुसऱ्याने मोबाईलमधून आक्षेपार्ह छायाचित्रण केले, असा खळबळजनक आरोप

घटनेच्या सात दिवसानंतर तक्रार : पोलिसांची धावपळनागपूर : पाच जणांनी आपल्याला कारमधून कळमेश्वरजवळ नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून एकाने बलात्कार केला तर, दुसऱ्याने मोबाईलमधून आक्षेपार्ह छायाचित्रण केले, असा खळबळजनक आरोप असलेली तक्रार एका महिलेने नंदनवन पोलिसांकडे नोंदवली. मेधा (वय २८, नाव बदलवलेले) नामक ही महिला नंदनवनमध्ये भाड्याच्या घरात राहते. महिलेच्या तक्रारीनुसार, १४ जुलैच्या दुपारी २ वाजता अमित मुटकरे याने तिला नंदनवन ठाण्यात बयान द्यायला जाऊ, असे म्हणून कारमध्ये बसवले. त्याच्यासोबत त्याचा भाऊ अविनाश, सुयोग, विशाल आणि विजेंद्र होते. या पाच जणांनी कळमेश्वर फाट्याजवळ एका घरात नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून अमितने बलात्कार केला अन् अविनाशने मोबाईलवरून या बलात्काराचे छायाचित्रण केले. यानंतर आरोपींनी आपल्याला सोडून दिले, असे मेधाने तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, १४ जुलैच्या या घटनेची तक्रार मेधाने २१ जुलैला सायंकाळी नंदनवन ठाण्यात केली. सायंकाळची वेळ असल्याने आणि महिलांना पोलीस ठाण्यात सायंकाळी बसवून ठेवण्याची मनाई असल्याने पोलिसांनी २२ जुलैला या प्रकरणी अपहरण, बलात्कार, धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले. मात्र, पोलिसांच्या चौकशीनंतर मेधाने मेडिकल करून घेण्यास नकार दिला. तिने यापूर्वी अनेक ठाण्यात अनेकांविरुद्ध तक्रारी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सक्करदऱ्यात जानेवारी महिन्यात मेधाने एकाविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस या प्रकरणातील तथ्य शोधून काढण्याच्या कामी लागले आहेत. (प्रतिनिधी)