शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 21:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. काणे यांनी त्यावेळी ही बाब लपवून ठेवून स्वत:च्या नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : परीक्षा नियंत्रक असताना वागले बेकायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. काणे यांनी त्यावेळी ही बाब लपवून ठेवून स्वत:च्या नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. डॉ. काणे १५ नोव्हेंबर २०१० ते १३ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक होते. त्या काळात काणे यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची उन्हाळी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ यातील तरतुदीनुसार परीक्षा नियंत्रक किंवा परीक्षा संचालक विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे संरक्षक असतात. त्यामुळे काणे यांनी स्वत:ची मुलगी परीक्षा देणार आहे ही बाब लक्षात घेता परीक्षा कामापासून वेगळे व्हायला हवे होते किंवा सक्षम अधिकाऱ्याला त्याबाबत लेखी कळवायला पाहिजे होते. परंतु, काणे यांनी यापैकी काहीच केले नाही असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात मिश्रा यांनी कुलपतींकडे लेखी तक्रार केली होती. ती तक्रार फेटाळल्या गेल्यामुळे मिश्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काणे यांनी नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचे जाहीर करण्यात यावे व त्यांना कुलगुरू पदावरून कमी करण्यात यावे अशी विनंती मिश्रा यांनी न्यायालयाला केली आहे.कुलपतींना नोटीसन्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर कुलपती, विद्यापीठाचे कुलसचिव व डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी होईल.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ