शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री सहकारी संस्थांचा ‘हिशेब’

By admin | Updated: July 17, 2015 03:26 IST

केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे.

कारवाई होणार : विशेष सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात नागपूर : केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत थेट गावात जाऊन नागपूर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची ही विशेष मोहीम गेल्या १ जुलैपासून सुरु झाली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यांचा उद्देश सफल झाल्यानंतर संचालक व संस्थापकांनी संस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गृहनिर्माण, उद्योग, बेरोजगार, ग्राहक या नावाने स्थापन झालेल्या संस्था नेमक्या कुठे आहेत, याचा शोध घेणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सहकार विभागाने या संस्थांना लेखा परीक्षण करून घेण्याच्या सूचना देऊनही परीक्षण केले नाही. तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहिती उपलब्ध नाही. काही संस्था कागदोपत्रीच आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सहकार विभागाचे अधिकारी, तसेच लेखा परीक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावागावात जाऊन नोंदणी झालेल्या सर्व संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. ज्या संस्थांचा ठावठिकाणा नाही, त्या संस्था तातडीने बंद करण्यात येतील, असेही भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)