शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२२ मार्गांनी करता येतो अंबाझरी तलाव परिसरात प्रवेश : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 20:15 IST

हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.

ठळक मुद्देतातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाला देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, हिंगणा एमआयडीसी व वाडी येथील सांडपाणी मिसळत असल्यामुळे अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. नीरीचे तज्ज्ञ तलावातील पाण्याची तपासणी करणार आहे. त्याचा अहवाल व उपाययोजनांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. याशिवाय नीरी तलावात झपाट्याने वाढत असलेल्या जलवनस्पतीच्या निर्मूलनाचा मार्गही सांगणार आहे. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत तलाव परिसरात २० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, वन विभाग, महापालिकेच्या मदतीने तलावाचे खोलीकरण करणार असून त्यातून निघणारा गाळ झाडांच्या संवर्धनाकरिता वापरला जाणार आहे. न्यायालयाने हे सर्व मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणात १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे, वाडी नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.एसटीपीला मंजुरी केव्हाअंबाझरी तलावात सांडपाणी मिसळू नये याकरिता वाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारला जाणार आहे. त्याला किती दिवसात मंजुरी प्रदान करता अशी विचारणा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला केली व यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, प्रकल्पाचा प्रस्ताव कधी सादर करण्यात आला, प्रस्तावात असलेल्या त्रुटी इत्यादीची माहितीही प्राधिकरणला मागण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmbazari Lakeअंबाझरी तलाव