शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदभार स्वीकारण्यापूर्वीच गडकरी ‘अ‍ॅक्टिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:15 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपुरात जाणून घेतल्या सिंचन विभागातील समस्या : तज्ज्ञांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपल्या ‘हटके’ कार्यप्रणालीसाठी परिचित असलेले गडकरींनी पदभार स्वीकारण्याअगोदरच आपल्या अभ्यासू वृत्तीने कामाला सुरुवात केली. रविवारीच त्यांनी सिंचन तज्ज्ञांशी चर्चा केली आणि विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.गडकरी यांचा सिंचन प्रकल्पांवर अगोदरपासूनच अभ्यास आहे. मंत्री नसतानादेखील या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. नवी दिल्लीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गडकरी रविवारी नागपूरला आले. निवासस्थानी निवांत वेळ न घालवता त्यांनी तातडीने सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांना तसेच विभागातील अधिकाºयांना बोलावून घेतले. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत येणाºया प्रकल्पांची स्थिती, गोसेखुर्दसमोरील आव्हाने तसेच भूजलपातळी वाढविण्यासंबंधी उचलण्यात आलेली पावले यासंदर्भात जाणून घेतले. या कामांना गती देण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आवश्यक आहे याबाबतदेखील त्यांनी तज्ज्ञांचे विचार ऐकले. राज्यातील २६ प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पांना एकूण १८ हजार ६५४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यात केंद्र शासनाचा वाटा हा १० हजार ६१५ कोटी ६२ लाख ९० हजार इतका आहे हे विशेष.रविवारी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचा व मांडलेल्या अडचणींचा अभ्यास केला. सोमवारी सकाळी ते नवी दिल्लीकडे रवाना झाले.मात्र अगोदरच अभ्यासू वृत्ती असलेले गडकरी विभागाचा गृहपाठ करून पदभार स्वीकारण्यासाठी गेले असल्यामुळे या विभागातदेखील ते धडाकेबाज कामगिरी करून दाखवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.