लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवित वर्षभर तिच्याचर अत्याचार करण्यात आला. लग्नाचा तगादा लावताच विषारी औषध देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्ना करण्यात आला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (बिबी) येथे घडली असून, पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.
सौरभ शंकर कोठाळे (२२, रा. पेंढरी, ता. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पेंढरी व सावळी (बिबी) ही गावे जवळजवळ आहेत. साैरभची सावळी (बिबी) येथील १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली. साैरभने तिचा विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यांचा हा प्रकार जानेवारी २०२० पासून सुरू हाेता. पुढे तिने साैरभकडे लग्न करण्याचा तगादा लावला. त्यामुळे संतापलेल्या साैरभने तिला साेमवारी (दि. ११) विषारी औषध खाद्यपदार्थातून खाऊ घातले. प्रकृती खालावल्याने कुटुबीयांनी तिला रुग्णालयात भरती केले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तिने बुधवारी (दि. १३) पाेलिसांना बयाण दिल्याने हिंगणा पाेलिसांनी भादंवि ३७६ (२) (जे) (एन) ३०७ व पाेक्साे ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून आाेपीस अटक केली.