शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या अ‍ॅपचा गैरवापर

By admin | Updated: May 12, 2017 02:56 IST

बँकेच्या यूपीआय अ‍ॅपचा गैरवापर करून काही ठगबाजांनी राज्यातील १२ शहरातील विविध बँकांना कोट्यवधी रुपयांनी

लाखोंची रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात : बँकिंग वर्तुळात खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बँकेच्या यूपीआय अ‍ॅपचा गैरवापर करून काही ठगबाजांनी राज्यातील १२ शहरातील विविध बँकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नागपुरातील लकडगंजमध्येही अशा प्रकारची एक घटना घडली असून, या प्रकारामुळे बँकिंग वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बँक खात्याशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल आणि ई-मेल आयडीचा वापर करून बँकेचा यूपीआय अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतो. त्याद्वारे आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करणे, तेथून दुसऱ्या खात्यात वळती करणे, असे व्यवहार करता येतात. बँक खातेधारकाच्या मागणीनुसार, बँकेची आॅनलाईन प्रणाली हे व्यवहार पार पाडते. त्याचा काही ठगबाजांनी पद्धतशीर दुरुपयोग करून घेतला आहे. आपल्या खात्यात एक रुपया नसताना आॅनलाईन बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून काही जण परस्पर लाखो रुपये दुसऱ्या खात्यात वळते करतात. नंतर ही रक्कम काढून घेतली जाते. अशा प्रकारचे अनेक गुन्हे राज्यभरात झाले असून, बँकेला अनेक ठगबाजांनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे. नागपुरातील लकडगंज भागात असलेल्या बँक आॅफ महाराष्टच्या वर्धमाननगर शाखेतही १५ ते १८ जानेवारी २०१७ दरम्यान दोन वेळा असे गैरव्यवहार झाले. आरोपी दीपक अशोक डुंबरे(रा. महेश नगर, वाठोडा रिंग रोड, नंदनवन) याने त्याच्या बँक खात्यात ६०२७०३६१२११ कोणतीही शिल्लक नसताना त्याच्या खात्यामधून त्याने ५०१००००९७६१८९१ आणि १४३४०००१०८१९६९३१ या खात्यांमध्ये दोनदा प्रत्येकी एक लाख (एकूण दोन लाख) रुपये वळते केले. तब्बल पाच महिन्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँक व्यवस्थापक आर. सेलूप्रताप होओ (रा. जुना सुभेदार लेआऊट हुडकेश्वर) यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. थोरात यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचे कलम ४१९, ४२० भादंवि, तसेच सहकलम ६६ (सी) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी डुंबरेचा शोध घेतला जात आहे. आॅनलाईनचा फटका नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यवहार करण्याची स्पर्धा सुरू झाली. बँकांनीही आपल्या खातेधारकांना आॅनलाईन व्यवहारासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विविध अ‍ॅपही उपलब्ध झाले. सर्वसामान्य नागरिकांना या प्रणालीचा किती फायदा झाला, हा विषय वादाचा ठरू शकतो. मात्र, ठगबाजांनी त्याचा लगोलग अ‍ॅपचा गैरफायदा घेतला. लकडगंजसारखेच पुणे, मुंबई, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे करून सुमारे २५ कोटी रुपयांनी गंडा घातल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.