शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी

By admin | Updated: June 4, 2016 02:47 IST

नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका व्यापाऱ्याला अटक केली.

सत्र न्यायालय : डब्बा व्यापार प्रकरणनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका व्यापाऱ्याला अटक केली. या आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला. अभिषेक मुकुंद बजाज, असे आरोपीचे नाव असून तो हिवरी ले-आऊट येथील रहिवासी आहे. या प्रकरणात आतापर्यंत कुशल किशोर लद्दड रा. रामदासपेठ, नीरज ओमप्रकाश अग्रवाल रा. हिवरी ले-आऊट, निमित किरिट मेहता रा. कांदिवली(पूर्व) मुंबई यांच्यासह १४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. अभिषेक याचे शास्त्रीनगर येथील हनि- रितिका अपार्टमध्ये कार्यालय आहे. या ठिकाणी अभिषेक, त्याचा भाऊ आशिष, अंकित मालू आणि विनय अग्रवाल हे बेकायदेशीररीत्या समांतर स्टॉक एक्सचेंज चालवून रोख स्वरूपात हा व्यवसाय करीत होते. या कार्यालयातून ‘सौदा सॉफ्टवेअर’ आणि अन्य संगणकीय सामुग्री जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींपैकी मालू आणि अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामिनावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. अभिषेक बजाज याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. सानप यांनी न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षाने आरोपीचा १० दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मागितला होता. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)