शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

आप आता स्थानिक निवणुकीत सहभाग घेणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:33 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने आता कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीतल पराभवाची कारणमीमांसा करून त्यावरील उपाय आणि मार्ग शोधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, विदर्भात होणाऱ्या स्यानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णयही पक्षाचे घेतला आहे.

ठळक मुद्देपक्षाची चिंतन बैठक : बुथ स्तरावर संघटन बांधणीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने आता कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीतल पराभवाची कारणमीमांसा करून त्यावरील उपाय आणि मार्ग शोधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, विदर्भात होणाऱ्या स्यानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णयही पक्षाचे घेतला आहे.विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पक्षाच्या पूर्व विभागाची चिंतन बैठक पार पडली. त्याय या विषयावर गंभीरपणे चिंतन करण्यात आले. या बैठकीला आपचे राज्य संयोजक रंगा रचुरे, राज्याचे सचिव धनंजय शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोबतच राज्य कमिटी सदस्य देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, सावलीच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, राज्य सह सचिव कविता सिंघल व अशोक मिश्रा, यांच्यासह विधानसभा निवडणुकीतील आपचे सर्व उमेदवार आणि पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.पक्षाच्या संगठन बांधणीवरही या बैठकीत विचारमंथन झाले. पक्षाचे काम वाढविण्यासाठी जिल्हा स्तर, विधानसभा स्तर आणि बूथ पातळीवर संघटन वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय झाला आहे. पक्षानणे यापुढे नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेऊन पुढे यावे, असेही ठरविण्यात आले आहे.बैठकीमध्ये रंगभाऊ राचुरे यांनी राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि आम आदमी पक्षाची भूमिका मांडली. आगामी काळासाठी रणनीती, विचारधारा आंदोलनाचे मुद्दे, स्वरूप आणि निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी काय करायला हवे, यावर मार्गदर्शन केले. धनंजय शिंदे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत स्थानिक रणनीती, राजकीय संबंधांबद्दल विचार मांडले. लोकप्रतिनिधी मिडिया, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधणे, नवीन सदस्य व कार्यकर्ता अभियान या विषयांवर चर्चा केली.देवेंद्र वानखडे यांनी जिल्हा व विधानसभा कार्यकारिणी, जबाबदारी व कर्तव्य, संघटना विस्तार या विषयांवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. अशोक मिश्रा व श्रीमती कविता यांनी पक्षाची भूमिका व पार्टी एकसंघता या विषयांवर प्रकाश टाकला. पारोमिता गोस्वामी यांनीही आपले अनुभव सांगितले. जगजीत सिंग यांनी फंड तसेच वर्गणी, खर्च, इव्हेंटनुसार खर्च, नियमित खर्च, खर्च सादर करणयची पद्धत उपस्थितांना समजाऊन सांगितली. बैठकीला पूर्व विदर्भातून पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AAPआपlocalलोकलElectionनिवडणूक