शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बापरे... माेपेडच्या हेडलाईटमधून निघाला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2023 20:04 IST

Nagpur News वाठाेडा परिसरात इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी काढताना हेडलाईटच्या गॅपमधून साप निघाला. महिलेने तातडीने गाडी थांबविली व सर्पमित्राच्या मदतीने हा साप काढण्यात आला.

नागपूर : आपण वाहनाने जात असताना रस्त्यावर जरी साप दिसला तरी थरकाप उडताे पण नागपुरात एका महिलेच्या माेपेडच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना घडली. वाठाेडा परिसरात इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी काढताना हेडलाईटच्या गॅपमधून साप निघाला. महिलेने तातडीने गाडी थांबविली व सर्पमित्राच्या मदतीने हा साप काढण्यात आला. साप काढतानाचा हा व्हिडीओ सध्या साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सीमा ढुलसे नामक ही महिला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्यादरम्यान बॅंक याेजनेच्या कलेक्शनच्या कामासाठी वाठाेडा स्थित प्रधानमंत्री आवास याेजनेच्या इमारतीत गेली हाेती. त्या एमएच-४९, आर-२४५९ या क्रमांकाच्या माेपेडने कलेक्शनसाठी गेल्या हाेत्या. इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी थांबवून कलेक्शनसाठी गेल्या. काम झाल्यावर परतल्यानंतर आपली गाडी काढत असताना त्यांना हेडलाईटच्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपटी दिसली. त्यांनी लागलीच गाडी थांबविली आणि सर्पमित्र लक्की खडाेदे, सतीश जांगडे, धीरज मेश्राम यांना सुचित केले. त्यांनी घटनास्थळी येऊन त्या सापाला हेडलाईटमधून बाहेर काढले. साप बाहेर काढतानाच हा व्हिडीओ साेशल मीडियावर खुप व्हायरल हाेत आहे. गाडी काढताना लगेच साप दिसल्याने बरे झाले. धावत्या गाडीत हेडलाईटवर साप आला असता तर भीतीमुळे  अपघात हाेण्याची शक्यता हाेती, अशी चर्चा आहे.

टॅग्स :snakeसाप