शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

By सुमेध वाघमार | Updated: December 22, 2023 17:28 IST

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नागपूर : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे.    देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेउन निर्देश दिले. त्यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत रुग्णालयांची स्थिती जाणून घेतली. ‘जेएन.१’ व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि आॅक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. शहरतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाद्वारे नाकाद्वारे देण्यात येणा-या बुस्टर डोसबाबत नियोजन करण्याचे देखील निर्देश दिले.गरज पडल्यास कोरोनाची चाचणी करा   कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. याशिवाय नागपूर महानगरपालिकेची चाचणी केंद्र देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी कोरोनामुळे होणारा धोका लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाताना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. मास्क लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या