नागपूर : ९४ वर्षांचे शेतकरी वृंदावन पटेल यांना सहा महिन्यांपासून मणक्याचा त्रास होता. त्यांच्या दोन्ही पायात कमजोरी होती. त्यामुळे त्यांना अजिबात चालता येत नव्हते. लघवी व शौचालयाला त्रास व्हायचा. औषध आणि व्यायामाने सहा महिन्यात काहीच फायदा झाला नाही. एमआरआय आणि एक्स-रेची तपासणी केल्यानंतर डॉ. निखिल मलेवार यांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ९४ वयामध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेने नातेवाईक आणि रुग्ण चिंतित होते, पण त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. निखिल मलेवार यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यात मणक्याच्या हाडांना स्कू-रॉडने जोडले आणि नसांवरील दबाव काढून टाकला. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी पटेल यांच्या कमरेचे आणि पायातील दुखणे पूर्णपणे बंद झाले व ते सहा महिन्यानंतर पुन्हा चालायला लागले. डॉ. मलेवार म्हणाले, जास्त वय हे शस्त्रक्रिया न करण्याचे कधीच कारण नसते. सध्या अत्याधुनिक तंत्रानी मणक्याची शस्त्रक्रिया जास्त वयामध्ये यशस्वीरीत्या केली जाऊ शकते. डॉ. मलेवार हे नागपुरात मणक्याचे स्पेशालिस्ट म्हणून काम करतात. ते मणक्याच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण जर्मनी, अमेरिका व इंग्लंडमध्ये घेतले आहे. ते दर बुधवारी भंडारामध्ये दुपारी २ ते ४ पर्यंत लक्ष हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या रुग्णांसाठी उपलब्ध असतात. (वा.प्र.)
मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर ९४ वर्षांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST