शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

विना सर्जरी बदलविला ९२ वर्षाच्या वृद्धाचा हृदयाचा व्हॉल्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:53 IST

एरोटिक स्टेनोसिस आजाराने पीडित असलेल्या एका ९२ वर्षीय रुग्णावर अर्नेजा हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. या वृद्धाच्या हृदयाचा आकुंचित झालेला व्हॉल्व ट्रान्सकॅथेटर एरोटिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) पद्धतीने शस्त्रक्रिया न करता बदलण्यात आला. या वयाच्या वृद्धावर देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे उपचार यशस्वीपणे करण्यात आल्याचा दावा अर्नेजा रुग्णालयाचे प्रमुख व ज्येष्ठ इन्टरव्हेन्शनल कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केला.

ठळक मुद्देटीएव्हीआर पद्धतीने उपचार सुलभ : वयोवृद्धावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरोटिक स्टेनोसिस आजाराने पीडित असलेल्या एका ९२ वर्षीय रुग्णावर अर्नेजा हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. या वृद्धाच्या हृदयाचा आकुंचित झालेला व्हॉल्व ट्रान्सकॅथेटर एरोटिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) पद्धतीने शस्त्रक्रिया न करता बदलण्यात आला. या वयाच्या वृद्धावर देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे उपचार यशस्वीपणे करण्यात आल्याचा दावा अर्नेजा रुग्णालयाचे प्रमुख व ज्येष्ठ इन्टरव्हेन्शनल कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केला.शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, ७५ वर्षापेक्षा अधिक वयाचा ५ ते ८ टक्के वृद्धांना हा आजार होत असतो. यामध्ये हृदयाचा एरोटिक व्हॉल्व संकुचित होतो. यामुळे श्वास भरणे, चक्कर येणे यासह हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. रुग्णाचे आयुष्य संघर्षमय होते. अनेक रुग्ण तर तीन-चार वर्षापेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. यावर उपचार करण्यासाठी हृदयावर शस्त्रक्रिया करूनच व्हॉल्व बदलला जाऊ शकत होता. यामुळेच ऑपरेशन करण्यास टाळले जायचे. मात्र टीएव्हीआर तंत्रज्ञान आल्याने ही शस्त्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यांनी सांगितले की, मॉईलमधून निवृत्त झालेला हा ९२ वर्षीय नागरिक बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडूनच उपचार घेत होता. मात्र त्याचे ऑपरेशन करणे शक्य नव्हते. आता टीएव्हीआर पद्धतीने त्यांचे ऑपरेशन करणे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या सहा महिन्यात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेला हा तिसरा रुग्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामध्ये पायाच्या नसांमधून हृदयाचा व्हॉल्व बदलण्याची प्रक्रिया केली जाते. यामध्ये अ‍ॅनेस्थिसिया देण्याची गरज पडली नाही. तिसऱ्याच दिवशी रुग्णाला सुटी दिल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संबंधित रुग्णाला रक्तदाब किंवा मधुमेहाचाही त्रास नाही. १९८७ साली ते मॉईलमधून निवृत्त झाले होते. या रुग्णानेही स्वत:मध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे कबूल केले. या शस्त्रक्रियेमध्ये मुंबईचे कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. अमोल सोनवणे, डॉ. विवेक, डॉ. अमर आमले, डॉ. अभिषेक वडसकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगdoctorडॉक्टर