शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)ला सोमवारी ९१.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)ला सोमवारी ९१.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला असून, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

मागील दोन वर्षांपासून बार्टीच्या अनेक योजना निधीअभावी बंद पडल्या आहेत. निधी मिळत नसल्याने बार्टीला बंद केले जात असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी संघटनांनी १४ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनांतर्गत शासनाला जाब विचारला जाणार होता. सोशल मीडियावर या आंदोलनाला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, राज्य शासनाने सोमवारी बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित केला. तसेच बार्टीची कोणतीही योजना बंद पडणार नाही. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले. यासंदर्भात तातडीने शासन निर्णयसुद्धा जारी केले. यानुसार बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समितीसाठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये सोमवारी तातडीने वितरित केले. दरम्यान, बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची सद्यस्थिती जाणून घेत काही नवीन योजनादेखील आखण्यात येत आहेत, याबाबत बार्टी स्तरावर लवकरच एक सर्वंकष बैठक घेण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

- आंदोलन स्थगित पण पाठपुरावा करणार

या निर्णयाचे स्वागत. विद्यार्थी व समाजातील एकजुटीचा हा विजय आहे. ही रक्कम तातडीने बार्टीला देऊन बंद कोर्सस सुरू करावेत आणि यासंदर्भात सर्व विभागाचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे. आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु बार्टीच्या महासंचालकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार. तसेच शेवटपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार.

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड