शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह,नागपुरात आतापर्यंत ९८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:53 IST

राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देविदर्भात रुग्णांची संख्या १७२

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, सलग सात दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपुरात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत आज ५८ नमुने तपासले. यातील ३८ नमुने निगेटिव्ह आले. उर्वरित २० नमुन्यांमधून यवतमाळ जिल्ह्यातील नऊ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ४५, ३५, २४ वर्षीय महिला व ५७, ५२, ३७, ३६, २४ वर्षीय पुरुष व १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. ११ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले.नागपुरात गेल्या २२ दिवसांमध्ये ८२ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ९८ वर पोहचली आहे. यातील १५ रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ आहे. यातील सात रुग्ण बरे झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एकाचा मृत्यू तर आठ बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, आज या जिल्ह्यातील नमुन्यांच्या प्राप्त झालेल्या अहवालात १० ही नमुने निगेटिव्ह आले. अमरावती जिल्ह्यात आठ रुग्ण व तीन मृत्यूची नोंद आहे. गोंदिया व वाशिम जिल्ह्यात एक-एक रुग्णाची नोंद असून गोंदिया जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरा झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळ