शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९७१ आजारांसाठी वैद्यकीय कवच

By admin | Updated: February 23, 2017 02:11 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न

राजीव गांधी जीवनदायी योजना : आरोग्य मित्र देतील सुविधा नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना थेट मदत मिळणार आहे. या योजनेत ९७१ आजारांसाठी वैद्यकीय मदत मिळणार आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहे. रुग्णांपर्यंत सेवा पोहोचविताना काही अडचण निर्माण झाल्यास टोल फ्री वर तक्रार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला मिळावा या उद्देशाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील पिवळी, अन्नपूर्णा, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेवरील एक लक्ष रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा कुटुंबीयांना विमा संरक्षणाद्वारे ९७१ आजारांवर वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल. या योजनेसंदर्भात माहितीसाठी येणाऱ्या तक्रार निवारण्याकरिता थेट १५५३८८/ १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)