शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

९३ शिक्षण संस्था अध्यक्ष, प्राचार्यांना वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:14 IST

स्कूल बसेसच्या फिटनेसप्रकरणी आदेश देऊनही हजर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९३ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांना जमानती वॉरंट जारी केला आहे.

ठळक मुद्देस्कूल बस फिटनेसप्रकरण : हायकोर्टाचा आदेश पाळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कूल बसेसच्या फिटनेसप्रकरणी आदेश देऊनही हजर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९३ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांना जमानती वॉरंट जारी केला आहे.बारा हजार स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हायकोर्टाने १५ सप्टेंबर रोजी १२६ शाळांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड बसविला होता. हा दंड न भरणाºया शाळांच्या अध्यक्ष व प्राचार्य यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार १२६ पैकी केवळ काही शाळा हायकोर्टात हजर झाल्या, ही गंभीर बाब न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. ज्या शाळा हायकोर्टात आजतागायत हजर झाल्या नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करा आणि अशा गैरहजर असलेल्या शाळांची नावे द्या, असे आदेश हायकोर्टाने ४ आॅक्टोबर रोजी दिले होते. त्यानंतर १२६ पैकी ३३ शाळा हायकोर्टात हजर झाल्या होत्या. उर्वरित ९३ शाळांच्या अध्यक्ष व प्राचार्यांनी हायकोर्टाच्या आदेशाकडे कानाडोळा केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी बुधवारी ९३ अध्यक्ष व प्राचार्य यांच्याविरुद्ध २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्याचा जमानती वॉरंट जारी केला. या आदेशामुळे प्राचार्य व अध्यक्षांचे धाबे दणाणले आहे.दरम्यान शहरात २४ हजार स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली असून १२ हजार बसेसची तपासणी करण्यात आलेली नाही. शाळा आणि जिल्हा स्तरावर समिती तयार करण्यात आली आहे. यानंतरही बारा हजार बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली नाही. स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करा, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले होते. या आदेशानंतरही स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे ज्या शाळांनी बसेसची फिटनेस तपासणी केली नाही, अशा १२६ शाळांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड मागील सुनावणीत बसविण्यात आला. यापैकी काही शाळांनी दंड भरला ते आपल्या वकिलांसह हायकोर्टात हजर झाले होते. १२६ शाळांना प्रतिवादी करण्यात आले. त्यापैकी ३३ शाळा हायकोर्टात हजर झाल्या. ९३ शाळा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.दरम्यान काही वर्षांपूर्वी वीरथ झाडे या शाळकरी विद्यार्थ्याचा स्कूल बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर लहान मुलांना शाळेत घेऊन जाणाºया आणि घरी परत आणणाºया स्कूल बस आणि आॅटोरिक्षांविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती.