शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत ८८ पोलीस शहीद

By admin | Updated: July 31, 2014 01:03 IST

विदर्भात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांमध्ये ८८ पोलीस जवान शहीद झाले तर १३९ निरपराध्यांचा नाहक बळी गेला. पडोळे ले-आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या

नक्षली हल्ल्यांचा लेखाजोखा : १३९ निरपराध नागरिकांचाही बळीनागपूर : विदर्भात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांमध्ये ८८ पोलीस जवान शहीद झाले तर १३९ निरपराध्यांचा नाहक बळी गेला. पडोळे ले-आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली ही माहिती आहे. नक्षली हल्ल्यांचा हा लेखाजोखा १ मे २००९ पासून ३१ मे २०१४ पर्यंतचा आहे. सर्वाधिक ३४ जवान शहीद२००९ मध्ये ३७ चकमकी होऊन २ नक्षलवादी मारल्या गेले होते तर सर्वाधिक ३४ पोलीस जवान शहीद झाले होते. १९ नागरिक ठार झाले होते. शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शासनाने २७ कोटी ७ लाख ८० हजाराची आर्थिक मदत दिली होती तर सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना ७२ लाखांची मदत देण्यात आली होती. याच काळात पाच नक्षलवादी पोलिसांना शरण आले होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी १० लाख ७५ हजाराची मदत देण्यात आली होती. २०१० मध्ये १६ चकमकी होऊन २ नक्षलवादी ठार झाले होते तर १० पोलीस जवान शहीद झाले होते. हल्ल्यात ३२ सामान्य नागरिकांचाही बळी गेला होता. शासनाने शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना ३ कोटी ८१ लाख २५ हजाराची आर्थिक मदत केली होती. मृत सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना १ कोटी १६ लाख एवढी मदत करण्यात आली होती. याच काळात २१ नक्षलवादी शरण येऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी २१ लाख ५० हजाराची मदत करण्यात आली होती. एका शहीद जवानासाठी ४४ लाखएकूण सहा वर्षांत १६९ चकमकी होऊन ५३ नक्षलवादी ठार झाले आणि ८८ पोलीस जवान शहीद झाले. १३९ सामान्य नागरिकांचा बळी गेला. शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना ३८ कोटी ९१ लाख ६८ हजाराची मदत करण्यात आली. ही सरासरी मदत प्रत्येक शहीद जवानांसाठी ४४ लाख रुपये एवढी आहे. मृत सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना ३ कोटी ९२ लाखांची मदत करण्यात आली आहे. ही सरासरी मदत प्रत्येक मृत नागरिकासाठी २ लाख ८२ हजार आहे.(प्रतिनिधी)