शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट

By admin | Updated: September 25, 2016 03:20 IST

स्वच्छता सप्ताहात स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवून प्रवाशांशी संवाद साधण्यात आल्याची माहिती

अमित कुमार अग्रवाल : अपघातप्रसंगी ‘अ‍ॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन’ लाभदायकनागपूर : स्वच्छता सप्ताहात स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवून प्रवाशांशी संवाद साधण्यात आल्याची माहिती दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेगाड्या आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विभागातील ८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट बसविण्यात आले असून मोतीबागच्या बायो टॉयलेट युनिटमध्ये या वर्षी २५०० बायो टॉयलेट बनविण्यात येणार असून यातील ९०० बायो टॉयलेट तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.डीआरएम अग्रवाल म्हणाले, स्वच्छता सप्ताहात रेल्वेस्थानक, परिसराची सफाई, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ स्टेशन दिनी अधिकारी, निरीक्षक, पर्यवेक्षकांनी रेल्वेस्थानकाच्या सफाईची पाहणी करून क्लिनिंग मशीन, टुल्स, प्लान्ट्सचे निरीक्षण केले. यात भारत स्काऊट गाईड, युनियन, विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. स्वच्छ रेल्वे दिनानिमित्त विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची सफाई करण्यात आली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. स्वच्छ नीर दिनानिमित्त रेल्वेस्थानक परिसरातील पाण्याच्या स्रोतांची सफाई करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. स्वच्छ सहयोग दिनानिमित्त प्रवाशांशी संवाद साधून घाण पसरविणाऱ्या प्रवाशांना दंड आकारण्यात आला. स्वच्छ संवाद दिनी प्रवाशांशी स्वच्छतेबाबत चर्चा करून पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सिनिअर डीसीएम अर्जुन सिबल आणि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेल्वेगाडीतच आॅपरेशनची सुविधादपूम रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण तीन अ‍ॅक्सीडेंट रिलीफ ट्रेन आहेत. यातील एक ट्रेन नॅरोगेज सेक्शनसाठी, एक गोंदिया येथे आणि एक गाडी इतवारी रेल्वेस्थानकावर तैनात आहे. गाडीत अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी पोहोचून मदत करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात तीन कोच असून एका कोचमध्ये आॅपरेशन थिएटर, दुसऱ्या कोचमध्ये १२ रुग्णांसाठी बेड, तिसऱ्या कोचमध्ये रुग्णांना खाण्यासाठी पदार्थ बनविण्याची सुविधा आहे. ही गाडी ताशी ११० किलोमीटर वेगाने धावते. गाडीत ‘व्ही सॅट टेक्नॉलॉजी’चा समावेश आहे. अपघातस्थळी मदतकार्य कसे सुरूआहे याचे थेट प्रसारण डीआरएम कार्यालय आणि रेल्वे बोर्डात पाहण्याची सुविधा असल्याचे मुख्य आरोग्य अधिक्षक डॉ. सुनंदा राहा यांनी सांगितले. याशिवाय एखाद्या पाण्याच्या ठिकाणी अपघात झाल्यास लाईफ जॅकेट, कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक कटर्स, घटनास्थळी हवेने फुलणारा टेंट उभा करण्याची सुविधा या रेल्वेगाडीत उपलब्ध आहे.