शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

८६ कोटींचा घोटाळा, पिता-पुत्रासह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई जगदीश जोशी लोकमत इम्पॅक्ट नागपूर : ८६ कोटींच्या ...

- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई

जगदीश जोशी

लोकमत इम्पॅक्ट

नागपूर : ८६ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे आणि त्यांचा मुलगा अभिषेकसह सहा आरोपींना अटक केली आहे. लोकमतने एका महिन्यापूर्वी प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आरोपींमध्ये खेमचंद मेहरकुरे, त्यांचा मुलगा अभिषेक मेहरकुरे, योगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे आणि अर्चना टेके यांचा समावेश आहे.

लोकमतने २३ नोव्हेंबरला या प्रकरणात पोलीस कुचराई करीत असून आरोपींना अटक करीत नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चौकशी केली. सोसायटीचे जगनाडे चौक, गणेशनगर येथे कार्यालय असून शिवनगर निवासी खेमचंद मेहरकुरे अध्यक्ष आहेत. घोटाळा २०१८ मध्ये उजेडात आला होता. सोसायटी डेली कलेक्शन, एफडी, आरडी आदींच्या माध्यमातून गुंतवणूक स्वीकारत होती. याकरिता एजंट नियुक्त केले होते. दोन वर्षांपूर्वी सोसायटी अचानक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागली. गुंतवणूकदारांनी याची तक्रार कोतवाली ठाण्यात केली होती. पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर गुंतवणूकदारांनी ठाण्यासमोर निदर्शने केली होते. एप्रिल २०१९ मध्ये मेहरकुरेने पोलिसांसमोर पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही पैसे परत केले नाही. याची तक्रार पीडितांनी न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशानंतर १३ जुलै २०१९ ला ४ कोटीचा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक पीडित तक्रार करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर हे प्रकरण १ सप्टेंबर २०१९ ला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी चौकशी करून ६.५० कोटींचा घोटाळा उजेडात आणला. सोसायटीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ७९.५४ कोटींचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली. पोलिसांचा तपास आणि ऑडिट रिपोर्टमध्ये आरोपींनी ८६ कोटींचा घोटाळा केल्याचे उजेडात आले. मीना जगताप यांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी नेते आणि अनेक प्रभावशाली लोक जुळले आहेत. आरोपींनी घोटाळ्याची रक्कम सुरक्षित लोकांच्या हातात सोपविल्याचा गुंतवणूकदारांना संशय आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींशी जुळलेल्या लोकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘आयाराम-गयाराम’ झाली आर्थिक शाखा

आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक निवृत्त कर्मचारी कंगाल झाले आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीची रक्कम सोसायटीत जमा केली होती. यातून त्यांनी मुलामुलींचे लग्न, शिक्षक आणि घराचे स्वप्न पाहिले होते. गेल्या एक वर्षात आर्थिक शाखेच्या पाच अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. पण ही शाखा आयाराम-गयाराम ठरली. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकऱ्यांना फटकारले. त्यानंतर डीसीपी विवेक मसाळ यांच्या नेतृत्त्वात निरीक्षक मीना जगताप यांच्याकडे चौकशी सोपविली. काही अधिकऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हे शाखा पांढरा हत्ती ठरली आहे.