शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

नागपुरात ८५.८३ लाखांची विषारी सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 10:24 IST

कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्दे‘एफडीए’ची कारवाईपोलिसांनी ट्रक घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करून विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू असल्याची घटना गुरुवारी उजेडात आली आहे. कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.मानकापूर आणि जरीपटका पोलिसांनी माहितीच्या आधारे विषारी सुपारीची वाहतूक करणारे दोन ट्रक बुधवारी रात्री ताब्यात घेतले. याची माहिती पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारी ४ वाजता दिली. अधिकाऱ्यांनी ट्रकमधील सुपारीची तपासणी करून नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आणि ट्रक जप्त करून वाहतूकदारांकडे ठेवले. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी कर्नाटक राज्यात ट्रकद्वारे पाठविण्यात येणारी ४५ लाख रुपये किमतीची विषारी सुपारी बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. एफडीएने ट्रक जप्त केला होता.भंडारा रोड, ट्रान्सपोर्टनगर येथील मंजूनाथ रोड लाईन्सच्या एमएच ४९ एटी ३५८२ क्रमांकाच्या ट्रकने सुपारी कर्नाटक येथे पाठविण्यात येत असल्याच्या माहितीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी कारवाई केली. या ट्रकमध्ये ४६.२१ लाख रुपये किमतीची २४,८४८ किलो सुपारी होती.ही सुपारी नागराज नारायण नाईक यांची आहे. याशिवाय मानकापूर पोलिसांनी ३९.६२ लाख रुपये किमतीची २५,०७८ किलो सुपारी ट्रकसह ताब्यात घेतली. ही सुपारी भंडारा रोड वर्धमाननगर, हल्दीराम फॅक्टरीजवळील ओम ट्रेडर्सचे जसबीरसिंग चटवाल यांची होती. हा ट्रक ट्रान्सपोर्टनगर येथील मौराणीपुरा लॉजिस्टिक प्रा.लि.च्या माध्यमातून दिल्ली येथील दोन व्यापाऱ्यांना पाठविण्यात येत होता.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या नेतृत्वात आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मानकापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी अमित उपलप व आनंद महाजन आणि जरीपटका ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड व प्रफुल्ल टोपले यांनी कारवाई केली.

इंडोनेशियातून होते आयातविक्री आणि साठवणुकीवर प्रतिबंध असलेली कोट्यवधी रुपयांची विषारी सुपारी नागपुरातून दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येते. या व्यवसायासाठी नागपूर मोठी बाजारपेठ आहे. सुपारीला करचोरी करून इंडोनेशियातून आयात करण्यात येते. विषारी सुपारीच्या सेवनाने लोकांना कॅन्सरसारखा गंभीर आजार होत आहे. याची गंभीर दखल घेत यापूर्वी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग