शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननातून ८.४४ लाख दंड वसूल

By admin | Updated: March 19, 2017 03:00 IST

अ‍ॅन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या

जिल्हाधिकारी कार्यालयाची कारवाई नागपूर : अ‍ॅन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६१ लोकांकडून ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शनिवारी दिली. अवैधपणे रेतीचे उत्खनन व वाहतूक तसेच दगड आदी मायनिंग संदर्भात शनिवारी प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक आठ प्रकरणे सावनेर तहसीलमध्ये नोंदविण्यात आली असून ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवापूर तालुक्यात तीन प्रकरणात १ लाख २ हजार, पारशिवनीत १ लाख ४३ हजार ७००, उमरेड १ लाख ६७ हजार ६०० तसेच इतर जिल्ह्यातही ६१ प्रकरणांमध्ये ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैधपणे रेती व दगड वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) जिल्ह्यात १ हजार ११८ प्रकरणात कारवाई अवैधपणे उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध १ एप्रिलपासून १ हजार ११८ प्रकरणात ४ कोटी ६९ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम शासन जमा करण्यात येऊन १३४ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.