शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी

By admin | Updated: September 13, 2016 02:35 IST

नागपूरसह विदर्भातील लाखो लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व

लोकमत महाचर्चेत नितीन गडकरी यांची घोषणा : उपराजधानीत उड्डाणपुलांचे जाळे, अनेक रोडचे सिमेंटीकरणनागपूर: नागपूरसह विदर्भातील लाखो लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे २४ हजार कोटींचे विविध प्रकल्प नागपूर शहर व जिल्ह्यासाठी मंजूर केल्यानंतर आता पुन्हा नागपूरच्या विकासासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली असल्याची घोषणा गडकरी यांनी लोकमत समूहातर्फे रविवारी आयोजित महाचर्चेत केली. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवारी कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्झ येथे ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ ही एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना गडकरी यांनी विदर्भवासीयांना ही गुड न्यूज दिली. विदर्भाच्या विकासात गडकरी यांचे मोलाचे योगदान आहे. सत्तेत असो वा विरोधी बाकावर त्यांनी विकासाचा प्रवाह नेहमीच गतिशील केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर आंतरराष्ट्रीय शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांनी मंजूर करून घेतलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या कामांतून वाहतूक व्यवस्था वेगवान करण्यासाठी शहरभर उड्डाणपुलांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. तसेच, अनेक महत्त्वाच्या मार्गांचे काँक्रिटद्वारे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. गडकरींनी केलेल्या या घोषणेमुळे महाचर्चेच्या आयोजनातून लोकहित साधण्याचा लोकमतचा हेतू साध्य झाला आहे.