शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

ज्ञानगंगेच्या जमिनीसाठी हवेत आठ कोटी

By admin | Updated: May 19, 2016 02:43 IST

विदर्भातील १४ जिल्ह्यात ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राच्या माध्यमातून ज्ञानगंगेचा प्रसार होत आहे.

‘इग्नू’ला हक्काची जमीन कधी मिळणार : प्रशासनाने मागितली बाजारमूल्यानुसार रक्कमनागपूर : विदर्भातील १४ जिल्ह्यात ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राच्या माध्यमातून ज्ञानगंगेचा प्रसार होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे केंद्र भाड्याच्या जागेतच सुरू आहे. अत्यंत लहान जागेत केंद्राचा कारभार सुरू असून, यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागपुरातच शासनाने मंजुरी दिलेली जमीन बाजारमूल्यानुसार (आठ कोटी) घेण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. परंतु खासगी संस्थांना अत्यंत कमी किमतीत जमीन देणाऱ्या प्रशासनाने गरिबांना शिक्षण देणाऱ्या ‘इग्नू’ला आठ कोटी मागणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.२००९ साली ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राची सुरुवात झाली. दरवर्षी येथे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमरावती मार्गावरील एका इमारतीमधून या केंद्राचा कारभार सुरू आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन शहरातच कमी दरात जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला होता. मानेवाडा येथील ओंकारनगर येथील जागा यासाठी पाहण्यात आली होती व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ कोटी ८ लाख ८९ हजार ३८० रुपये या बाजारभावानुसार जागा देण्यात येईल, असे पत्रच ‘इग्नू’च्या विभागीय संचालकांना पाठविले. त्यामुळे स्वतंत्र कार्यालयासाठी विभागीय केंद्राचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. एवढी मोठी रक्कम देणे अशक्य असल्यामुळे विद्यादानाच्या कार्यासाठी काम करणाऱ्या ‘इग्नू’ला पुन्हा शासनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत.(प्रतिनिधी) कमी किमतीत हवी जागा‘इग्नू’च्या विभागीय केंद्रात सात हजारांवर विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी हे खासगी नोकरी वा धंदा करून शिकतात. गडचिरोली ते मुंबईपर्यंत विद्यार्थी असून प्रवेशापोटी तुटपुंजे पैसे आकारण्यात येतात. अशास्थितीत आठ कोटी रुपये देणे शक्य नसल्याचे विभागीय संचालक डॉ. शिवस्वरूप यांनी सांगितले. विभागीय केंद्राला शहरातच जागा हवी असल्याने ती जागा कमीतकमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रपातळीवरून लवकर मदत मिळणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विद्यार्थीच नव्हे अधिकाऱ्यांना अडचण‘इग्नू’च्या विभागीय केंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, कार्यशाळा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी उपक्रमांचे नियमित आयोजन करावे लागते. परंतु यासाठी पर्याप्त जागा नाही. अतिशय लहानशा सभागृहात बैठकी घ्याव्या लागतात. तेथे बसण्यासाठी अडचण होते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना एखाद्या मान्यवराचे मार्गदर्शन उभे राहून ऐकावे लागते. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याचे दिसून येते. अशास्थितीत ही ज्ञानगंगा वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पुस्तकांसाठी जागा नाही‘इग्नू’कडूून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्डटी मटेरियल’ पोहोचविण्यात येते. यासाठी येणारी पुस्तके ठेवण्यासाठी कार्यालयात जागा नाही. त्यामुळे अनेकदा ‘रिसेप्शन’वरच पुस्तकांचा ढीग लावून ठेवावा लागतो.