शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

७८ हजार शेतकऱ्यांनी भरले ६४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जवळपास ६६ टक्के सवलत देऊन शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणाऱ्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भात चांगला प्रतिसाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जवळपास ६६ टक्के सवलत देऊन शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणाऱ्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत असून या धोरणाचा लाभ घेत सुमारे ७८ हजार शेतकऱ्यांनी ६४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा केला आहे. धोरणानुसार जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम गावाच्या विकासासाठी सोबतच ३३ टक्के रक्कम जिल्ह्यातील विकास कामावर खर्च होणार असल्याने या योजनेमुळे गावासोबतच जिल्ह्याचा कायापालट होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाला विदर्भातील महावितरणच्या नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया आणि चंद्रपूर या सर्व पाचही परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धोरणाच्या व्यापक प्रसारासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह अभियंते, जनमित्र आणि सर्व तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क, ग्राहक मेळावे, विविध प्रसिद्धिमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे या धोरणाला यश मिळत आहे. यासाठी महावितरणकडून संपूर्ण विदर्भात ३५८ ग्राहक मेळावे, २०६ ग्रामसभा, १७५ ठिकाणी ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले.

कृषी ऊर्जा धोरणाचा २३ मार्च २०२१च्या अखेरीस विदर्भातील ७७ हजार ५६६ कृषी पंपधारक ग्राहकांनी लाभ घेतला असून या ग्राहकांनी थकीत वीज बिल आणि चालू महिन्याचे वीज बिल अशा दोन्ही बिलापोटी सुमारे ६४ कोटी ३० लाख रुपयांचा भरणा केला आहे. नागपूर परिमंडळात २१ हजार ४१२ शेतकऱ्यांनी सर्वाधिक १८.९५ कोटी रुपये भरले आहेत. या धोरणांनुसार शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे.

चौकट

विदर्भातील परिमंडळनिहाय भरलेली रक्कम

परिमंडळ शेतकरी भरलेली रक्कम (कोटीत)

नागपूर २१,४१२ १८.९५

चंद्रपूर २१,६६० १५.४१

गोंदिया १२,७९२ ११.१०

अकोला १३,०६२ ८.६७

अमरावती ९,६४० १०.१८

.