शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  जिल्ह्यात दीड लाखावर अर्जदारांना ७६९ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:42 IST

जिल्ह्यात शिशु योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ८४७ लाभार्थ्यांना ३६७ कोटी ८२ लाख रुपये, किशोर योजनेअंतर्गत ९ हजार २६१ लाभार्थ्यांना २०८ कोटी ९७ लाख रुपये, तरुण योजनेअंतर्गत २ हजार ४५८ लाभार्थ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपयांचे असे एकूण ७६९ कोटींचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री मुद्रा बँक योजना : स्वयंरोजगारासाठी हक्काचे कर्ज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात शिशु योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ८४७ लाभार्थ्यांना ३६७ कोटी ८२ लाख रुपये, किशोर योजनेअंतर्गत ९ हजार २६१ लाभार्थ्यांना २०८ कोटी ९७ लाख रुपये, तरुण योजनेअंतर्गत २ हजार ४५८ लाभार्थ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपयांचे असे एकूण ७६९ कोटींचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. कर्ज वाटपामध्ये नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यादृष्टीने कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. स्वयंरोजगारासाठी युवकांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज बँकेच्या प्रतिनिधींना दिल्यात. स्वयंरोजगारासाठी हक्काचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात सर्व बँकांनी छोट्या व्यावसायिकांना सुलभपणे कर्ज पुरवठा करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.प्रधानमंत्री मुद्रा बँक कर्ज पुरवठा योजनेमध्ये इंडलँड बँक, एचडीएफसी, रत्नाकर बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी चांगले काम केले असून इतर वाणिज्य बँकांनी अत्यंत अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अशा बँकांनी यापुढे मुद्रा योजनेमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक गरजूंना कर्ज पुरवठा करावा अशा सूचना यावेळी दिल्यात. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानbankबँक