शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला तालुक्यात ७६ मि.मी. पाऊस

By admin | Updated: June 23, 2016 22:41 IST

विदर्भात सर्वाधिक पावसाची अकोल्यात नोंद; २७ जून रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता

अकोला: राज्यात मॉन्सून दाखल झाला असून, या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसले तरी मागील २४ तासांत विदर्भात अनेक तालुक्यांसह ३७ ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक ७६ मि.मी. पावसाची नोंद अकोला तालुक्यात करण्यात आली आहे.नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा कायम असून, पुढील तीन ते चार दिवसांत पश्‍चिम उत्तर प्रदेश व पश्‍चिम मध्य प्रदेशचा उर्वरित भाग, हरियाणा,चंदीगढ-दिल्ली व पंजाबचा बहुतांश भाग आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हा पाऊस दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. मागील २४ तासांत २३ जून सकाळी ८.३0 पर्यंत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी जोरदार व तुरळक स्वरू पाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.दरम्यान, अकोला तालुक्यात ८ सें.मी. म्हणजेच ७६ मि.मी. (३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद विदर्भात सर्वाधिक आहे. त्यानंतर नागपूर येथे ७ सें.मी., शेगाव ५ से.मी., चिमूर, देवळी, घाटंजी व तेल्हारा व वर्धा येथे प्रत्येकी ४ सें.मी. पाऊस झाला. बाभूळगाव, बाश्रीटाकळी, चिखली, कारंजा, लोणार, मूर्तिजापूर, रामटेक, समुद्रपूर व सेलू येथे प्रत्येकी ३ सें.मी., बुलडाणा, दर्यापूर, धामणगाव, हिंगणा, कळंब, कळंबेश्‍वर, खामगाव, नांदुरा, पातूर, वाशिम येथे प्रत्येकी २ सें.मी., अंजनगाव, बाळापूर, ब्रम्हपुरी, चांदूर, मालेगाव, पांढरकवडा, रिसोड, सावनेर व वरुड येथे प्रत्येकी १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, येत्या २३ ते २७ जून या काळात कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी,तर मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.