शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

प्रवेशाच्या नावावर ७.५० लाखाने फसविले

By admin | Updated: February 11, 2017 02:45 IST

बीएएमएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयाने फसवणूक

स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकास अटक : साथीदारांचा शोध सुरू नागपूर : बीएएमएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणि स्पर्धा परीक्षात देत असलेल्या युवकास तहसील पोलिसांनी अटक केली. मनीष कोरडे (२६) शिवसेना चौक, चिटणीसनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याची साथीदार ज्योत्स्ना त्यागी (४२) रा. मनीषनगर आणि रोहित कनोजिया (२५) रा. झिंगाबाई टाकळी फरार आहेत. आरोपींनी अनेकांची या प्रकारे फसवणूक केल्याचा संशय आहे. गोळीबार चौक येथील वनश्री उमरेडकर यांच्या मुलीला बीएएमएसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. वनश्री यांची मनीषसोबत ओळख आहे. त्यांच्या एका नातेवाईकांच्या मुलीसोबतच मनीषचे लग्न होणार होते. पदवीधर असलेला मनीष स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्यामुळे वनश्री यांना त्याच्यावर विश्वास होता. मनीषने ज्योत्स्ना व रोहितसोबत वनश्री यांची ओळख करून दिली. त्यांनी वनश्री यांच्या मुलीला उमरेड रोडवरील एका खासगी महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला. वनश्री यांना आरोपींच्या बोलण्यावर विश्वास बसला. आरोपी महिलेला कॉलेजमध्ये घेऊन गेले. तिथे एका ठिकाणी त्यांना बसविले व प्राचार्यांनी प्रवेशासाठी होकार दिल्याचे सांगितले. यानंतर कॉलेज संचालकांच्या बंगल्यावरही घेऊन गेले. वनश्रीला बंगल्याच्या एका दालनात बसविले. कॉलेज संचालक मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगून महिलेला परत पाठविले. आरोपींनी वनश्री यांच्याकडून जून २०१६ ते जुलै महिन्यादरम्यान साडेसात लाख रुपये घेतले. यानंतर प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते संचालक व इतर लोकांशी फोनवर बोलून महिलेला प्रभावित करायचे. अनेक दिवस असाच प्रकार सुरू होता. शेवटी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी लागली तेव्हा त्यात मुलीचे नाव नसल्याने वनश्री चिंतेत पडल्या. आरोपींनी त्यांना आणखी काही दिवस शांत राहण्यास सांगितले. परंतु वारंवार टाळाटाळ होत असल्याने महिलेला त्यांच्यावर संशय आला. त्यांनी आपले पैसे परत मागितले. यानंतर आरोपी फरार झाले. वनश्री यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच ज्योत्स्ना त्यागी भाड्याचा फ्लॅट खाली करून गायब झाली. रोहित कनोजिया सुद्धा फरार झाला. तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनीष कोरडेला अटक केली. (प्रतिनिधी)