शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पारपत्र बनविण्यासाठी असलेल्या गर्दीमध्ये ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:35 IST

सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.

ठळक मुद्देपीएसकेमध्ये न्यून कर्मचारी संख्येत चालत आहे काम

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग तीन महिने ताळेबंदी नंतर पासपोर्ट कार्यालय आणि पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले आहे. परंतु, पासपोर्ट बनविण्यासाठी आॅनलाईन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांची संख्या ७५ टक्के ने घसरली आहे. सोमवारी केवळ १३५ अपॉइंटमेंट ची नोंदणी झाली. सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.कोविड-१९ प्रकोपाच्या काळात जिथे परदेशात फसलेले भारतीय परत येत आहेत, तेथे विदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पासपोर्ट बनविण्यासाठी लोक येत नसल्याचे प्रमुख कारण आहे. दीड वर्षापर्यंत अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी वेटिंगची स्थिती असायची. त्या काळात पासपोर्ट बनविण्याच्या कामाचे विकेंद्रीकरणही झाले नव्हते. नंतर वर्धा सोबतच पोस्टाच्या काही कार्यालयात पासपोर्ट बनविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे, नागपुरातील 'पीएसके' मध्ये आवेदकांची संख्या ३० टक्के पर्यंत घसरली होती. तरी सुद्धा सरासरी दररोज ७०० आवेदक अपॉईंटमेंट घेत होते.

या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पीएसके मध्ये पासपोर्ट बनविणाºयांची संख्या बºयापैकी होती. मात्र मार्च पासून ही संख्या रोडावण्यास सुरुवात झाली. याच महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात ताळेबंदी मुळे कामकाज बंद करण्यात आले होते. त्यांनतर मे महिन्याच्या अखेर अखेर पर्यंत कामकाज सुरू करण्यात आले होते. पीएसके मध्ये आता रोज १०० ते १५० आवेदक पासपोर्ट बनविण्यासाठी पोहोचत आहेत. यातही बहुतांश लोक केवळ एक दस्ताऐवज म्हणूनच पासपोर्ट बनवत आहेत. तसेही नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डानांवर सद्यस्थितीत बंदीच आहे.हज आणि उमराह नसल्याने नुकसानकोरोनाच्या दुष्प्रभावामुळे यंदा मुस्लिम समाज हज यात्रेला जाऊ शकणार नाही. विशेष म्हणजे हज करिता वर्षभरात तिन हजाराहून अधिक पासपोर्ट बनविले जातात. याशिवाय प्रत्येक महिन्याला उमराह करिता जाणारे सरासरी २०० लोक पासपोर्ट बनवित असतात. पासपोर्ट द्वारे मिळणा?्या राजस्वात या दोन्ही यात्रांचे सहकार्य असते. ताळेबंदी पूर्वी पीएसकेमधून दररोज १२ ते १५ लाख रुपयांचे राजस्व प्राप्त होत होते. आता मात्र हा आकडा दोन लाखापर्यंत घसरल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आधी प्रमाणे ६ दिवसाच्या आत कोणत्याही तारखेलाच अपॉईंटमेंट चे निर्बंध आता नाही. आता जुलै महिन्याच्या कोणत्याही तारखेला अपॉईंटमेंट घेता येऊ शकते. तरी देखील इच्छुकांची संख्या रोडावलेलीच आहे.आरोग्य सेतू नाही तर प्रवेश नाही!सादिकाबाद येथील बºयाच अवेदकांना अपॉईंटमेंट मिळाल्यानंतरही रिकाम्या हाताने परत फिरावे लागल्याचे सांगण्यात येते. आवेदकांकडे मास्क, सॅनिटायजर, हातमोजे असणे गरजेचे आहे. शिवाय मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे साधा मोबाईल असेल त्यांना अपॉईंटमेंट असतानाही प्रवेश दिला जात नाही. साध्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड होत नसल्याने अशा अवेदकांची पंचाईत होत आहे.

टॅग्स :passportपासपोर्ट