शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.साठी ७५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:26 IST

जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे.

ठळक मुद्देउमेदवाराचे भाग्य इव्हीएममध्ये बंद : आज मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे. मतदान प्रक्रियेत तुरळक अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचा दावा निवडणूक अधिकाºयांनी केला आहे. २३७ ग्रा.पं.च्या सरपंचासह सदस्यपदाच्या उमेदवारांचे भाग्य सोमवारी मशीनबंद झाले. मंगळवारी तालुकास्तरावर मतमोजणी होऊन त्यांच्या भाग्याचा फैसला होईल.नरखेड तालुक्यात २२, काटोल २७, कळमेश्वर २३, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७,भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचे आज ९०० मतदान केंद्रांवर मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह होता, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर जाणवला. कामठी तालुक्यातील रनाळा ग्रा.पं.मध्ये बोगस मतदान झाल्याची माहिती आहे. सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथेही बोगस मतदान झाल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. मौदा तालुक्यातील माथनी, नरखेड तालुक्यातील मेंढला येथे इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडून तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणीला तालुकास्तरावर सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील २३७ गावांमध्ये दोन दिवसांपूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे.रात्री ८ पर्यंत चालले मतदानतारसामध्ये वॉर्ड क्र. ५ या मतदान केंद्रावर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. मतदान प्रक्रिया संपण्यापर्यंत मतदान केंद्राबाहेरही रांगा होत्या. त्यामुळे ५.३० पर्यंत जे मतदार रांगेत होते त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला रात्री ८ वाजले. तिथे मतदानाची टक्केवारी ८५.९१ टक्के नोंदविण्यात आली.दुपारी ३.३० पर्यंत ६३.५५ टक्के मतदानमतदानाला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद होता. पहिल्या तीन तासात जवळपास चार लाखाहून अधिक मतदान झाले होते. १.३० वाजेपर्यंत जवळपास ४५.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ६३.५५ टक्के मतदान झाले होते. यात सर्वाधिक मतदान हे काटोल तालुक्यात ७६.५ टक्के तर सर्वात कमी मतदान रामटेक तालुक्यात ५७.७९ टक्के झाले होते.