शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या ५० दिवसात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 00:21 IST

केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरिटेल व्यवसायात होणार मोठे बदल : १.५ लाख कोटीचे जीएसटीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यापाऱ्यांना वेबिनारद्वारे संबोधित करताना दिली.भरतीया म्हणाले, लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल दिसून येणार असून बाजारपेठांमध्ये केवळ २० टक्के ग्राहक येण्याची शक्यता आहे. अनेकांचा ऑनलाईनवर भर राहणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही सज्ज राहावे लागेल. कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये पुढेही राहणार असून ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणार नाहीत. या वित्तीय संकटामुळे लॉकडाऊन हटल्यानंतर देशातील किमान २० टक्के व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. अशा संकटसमयी रिटेल व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या नवीन तऱ्हा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. व्यापाऱ्यांना ग्राहककेंद्रित वातावरण तयार करावे लागेल, याशिवाय डिजिटल आणि संपर्करहित भुगतान आणि आयटीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच डिजिटल ई-कॉमर्ससह भौतिक दुकानाचे एकीकरण, नियम आणि कायद्याचे पालन केल्यास व्यापाऱ्यांना बदलत्या परिस्थितीत सक्षम होता येईल.भरतीया म्हणाले, कोविड-१९ ने भारतीय रिटेल व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायाचे भविष्य संकटात आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर व्यवसाय सुरू होण्यास किमान तीन महिने लागतील. डिसेंबर २०२० पर्यंत व्यवसाय सुरळीत होईल. सध्या देशातील रिटेल व्यापाºयांना नवरात्री ते दिवाळीत होणाऱ्या व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली असून दिवाळीत खर्च करतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यावर व्यापारी अवलंबून आहेत. भरतीया म्हणाले, आता बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारातही बदल होणार आहे. एकल अथवा खासगी व्यवसायाऐवजी आपसी सहयोगाचा अवलंब व्यापाऱ्यांना करावा लागणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यवहारात बदल घडवून आणावा लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय