शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

७२ टक्के मतदारांना हवे ‘बॅलेट’ने मतदान

By admin | Updated: March 5, 2017 01:52 IST

महाराष्ट्रात नुकत्याच महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांच्या ...

तिरपुडे महाविद्यालयाचे सर्वेंक्षण : २० टक्के इव्हीएमच्या बाजूने नागपूर : महाराष्ट्रात नुकत्याच महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर पराजित उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशीन (इव्हीएम)वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे जनमानसातही इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या धक्कादायक सर्व्हेनुसार ७२ टक्के नागपूरकरांनी इव्हीएमऐवजी बॅलेट पेपर पद्धतीने मतदानाला पसंती दिली असून केवळ २० टक्के नागरिकांनी इव्हीएमला अनुकूलता दर्शविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजेत्या पक्षाच्या उमेदवारांना वगळता इतर सर्व पक्ष व पराभूत उमेदवारांनी इव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करीत असंतोष व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम पसरला आहे. ही बाब लक्षात घेता तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल अ‍ॅक्शन अ‍ँड रिसर्च या शिक्षण संस्थेने सर्व्हे करून नागपूरकरांचे जनमत जाणण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम व मध्य क्षेत्रात १२९५५ मतदारांचे मत यामध्ये नोंदविले आहे. संस्थेने या सर्व्हेमध्ये इव्हीएम आणि बॅलेट पेपर यापैकी कोणती मतदान प्रणाली उपयुक्त आहे, हा प्रश्न मतदारांना विचारला. १२९५५ पैकी तब्बल ९३७४ मतदारांनी इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने मतदान राबविण्याला पसंती दिली आहे. केवळ २६७८ मतदारांनी इव्हीएमद्वारे मतदान करण्याला प्राधान्य दिले आहे. सर्व्हेमध्ये ९०३ मतदारांनी कुठलेही मत व्यक्त करण्यास असमर्थता व्यक्त केली. याचा अर्थ सर्व्हेनुसार ७२.३६ टक्के नागरिकांनी इव्हीएमद्वारे मतदानाला नकार देत बॅलेटद्वारे मतदानाला पसंती दिली आहे. केवळ २०.६७ नागरिकांनी इव्हीएमला पसंती दिली आहे. ६.९७ टक्के मतदारांनी तटस्थता दर्शविली.