शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांत बँकांमध्ये ७१ हजार कोटींचे घोटाळे : आरबीआयची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 20:15 IST

देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१७-१८ व २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाही अशा एकूण दीड आर्थिक वर्षांत देशातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ७१ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार घोटाळ्याची संख्यादेखील ६७ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोटाळ्यांची संख्या ६७ हजारांहून अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१७-१८ व २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाही अशा एकूण दीड आर्थिक वर्षांत देशातील बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ७१ हजार कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार घोटाळ्याची संख्यादेखील ६७ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती. २०१७-१८ ते २०१८-१९ या कालावधीत देशातील वाणिज्यिक बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, वर्षनिहाय आकडा किती होता, इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१७ ते २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये एकूण ६७ हजार ५०७ गैरप्रकार उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये ७१,६८० कोटी ६२ लाख ५५ हजार रुपयांच्या रकमेचा समावेश होता.वर्षभरात सहकारी बँकांमध्ये ३१ कोटींचे घोटाळेदरम्यान शहरी सहकारी बँकांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभरात १२९ आर्थिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ८६ कोटी ९७ लाख इतकी होती.दरदिवशी सरासरी १२३ घोटाळे२०१७-१८ ते २०१८-१९ च्या पहिल्या दोन तिमाहीत बँकांमध्ये ६७ हजार ५०७ आर्थिक घोटाळे झाले. जर घोटाळ्यांची दिवसनिहाय सरासरी काढली तर प्रत्येक दिवशी देशातील बँकांमध्ये १२३ घोटाळे झाले व घोटाळ्याची रक्कम १३० कोटी ८० लाख इतकी होती.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी