शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

७०० व्यक्तींचा लठ्ठपणा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:06 IST

नागपूर : ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार. परंतु हा एक आजार असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. परिणामी ...

नागपूर : ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार. परंतु हा एक आजार असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. परिणामी त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाने बेरियाट्रिक शस्त्रक्रियेला सुरूवात केली. मागील १० वर्षांत या विभागाने ७००वर रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करीत त्यांचा लठ्ठपणा दूर केला. विशेष म्हणजे, लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सर्वात प्रथम डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया सुरू केली.

भारतात जंकफूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. अनियंत्रित वजनामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अ‍ॅथरोस्केरासिस आदी आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्ती या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने दरवर्षी मरण पावतात. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कर्करोगाला बळी पडतात. सर्वाधिक लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. याची गंभीर दखल घेत मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये बेरियाट्रिक शस्त्रक्रियेला सुरूवात केली. मेडिकलमध्ये अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ७००वर या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांना याचा मोठा फायदा झाला आहे.

-१७० किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेडिकलमध्ये आतापर्यंत झालेल्या बेरियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये सर्वाधिक वजनाच्या म्हणजे, १७० किलो वजनी पुरुषावर बेरियाट्रिक सर्जरी डॉ. गजभिये यांनी नुकतीच यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर या पुरुषाचे वजन ९५ किलो झाले असून या शस्त्रक्रियेमुळे तब्बल ७८ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत आहेत.

शस्त्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग

डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. गिरीश कोडापे, डॉ. सागर कुरकुरे, डॉ. भूषण त्रिवेदी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बारसागडे, डॉ. डुमणे यांच्यासह निवासी डॉक्टर व परिचारिकांचे सहकार्य मिळत आहे.

विनाचिरा ‘बेरियाट्रिक सर्जरी’

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण बेरियाट्रिक सर्जरीकडे वळू लागले आहेत. हीच शस्त्रक्रिया आता विना चिरा देऊन करणे शक्य झाले आहे. ‘एण्डोस्कोपी’च्या मदतीने ‘बेरियाट्रिक सर्जरी’ केली जात असल्याने याचा फायदा विशेषत: महिलांना होत आहे.

-डॉ. राज गजभिये

प्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, मेडिकल

-कोरोनानंतर आता पुन्हा बेरियाट्रिक सर्जरी

कोरोनानंतर नव्या वर्षात पुन्हा बेरियाट्रिक सर्जरीला सुरूवात झाली आहे. या शस्त्रक्रिया नि:शुल्क केल्या जातात. यामुळे विदर्भासह मध्यभारतातील रुग्णांना याचा फायदा होत आहे.

-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल