शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

विदर्भात लसीकरणाला ७० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता त्याचा शुभारंभ शनिवारी झाला. विदर्भातील ११ ...

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता त्याचा शुभारंभ शनिवारी झाला. विदर्भातील ११ जिल्ह्यात ५४ केंद्रावर ५५८५ पैकी ३९१६ लाभार्थ्यांना (७०.११ टक्के) लस देण्यात आली. विशेष म्हणजे, नागपूर व अमरावतीच्या प्रत्येकी एका केंद्रावर भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोव्हॅक्सीन’ तर इतर सर्व केंद्रावर सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ लस देण्यात आली. इतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टक्के तर, सर्वात कमी लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात ५४.२५ टक्के झाले.

कोरोना संसर्गाच्या लढाईत पहिल्या फळीमध्ये असलेल्या रुग्णालयातील कोरोना योद्धांचा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात १७ हजार ८०० लाभार्थ्यांना ‘कोव्हिशील्ड’ तर, ५२०० लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’ लस दिली जाणार आहे. शनिवारी १२ केंद्र मिळून ११८५ लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यात ७७६ (६५ टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये लसीकरणाची टक्केवारी अधिक होती.

यवतमाळ जिल्ह्यात ५ केंद्रांवर प्रत्येकी १०० प्रमाणे ५०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. यातील ३५० (७० टक्के) लाभार्थ्यांनी लस घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात ६ केंद्रावर ६०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ३३० (५५ टक्के) लाभार्थ्यांनी लस घेतली. वर्धा जिल्ह्यात ६ केंद्रावर ६०० लाभार्थ्यांपैकी ३४५ (५७.५ टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात ३ केंद्रावर ३०० लाभार्थ्यांपैकी २१३ (७१ टक्के), गडचिरोली जिल्ह्यात ४ केंद्रावर ४०० लाभार्थ्यांपैकी २१७ (५४.२५ टक्के) , भंडारा जिल्ह्यात ३ केंद्रावर ३०० पैकी २६५ (८८.३३ टक्के) , अमरावती जिल्ह्यात ५ केंद्रावर ५०० पैकी ४४० (८८ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ६०० पैकी ५७५ (९५.८३ टक्के), वाशिम जिल्ह्यात ३ केंद्रावर ३०० पैकी १६७ (५५.६६ टक्के) तर अकोला जिल्ह्यातील ३ केंद्रावर ३०० पैकी २३८ लाभार्थ्यांना (७९.३३ टक्के) लस देण्यात आली.

-‘कोव्हॅक्सीन’चे अमरावतीत १०० टक्के तर नागपुरात ५३ टक्के लसीकरण

विदर्भातील ५४ केंद्रावर सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ तर नागपूर व अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येकी एका केंद्रावर लाभार्थ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सीन’ लस देण्यात आली. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्रावर १०० लाभार्थ्यांचे लसीकरणासाठी लक्ष्य देण्यात आले असता १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. तर, नागपूर जिल्ह्यातील मेडिकल केंद्रावर १०० मधून ५३ लाभार्थ्यांनी लस घेतली. कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा अद्यापही सुरू आहे. यामुळे ही लस देताना लाभार्थ्याची मंजुरी घेण्यात आली.

जिल्हालक्ष्य लसीकरण

नागपूर ११८५ ७७६

यवतमाळ ५०० ३५०

वर्धा ६०० ३४५

चंद्रपूर ६०० ३३०

गोंदिया ३०० २१३

गडचिरोली ४०० २१७

भंडारा ३०० २६५

अमरावती ५०० ४४०

बुलडाणा ६०० ५७५

वाशिम ३०० १६७

अकोला ३०० २३८