शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६५,५२७ शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज

By admin | Updated: July 20, 2015 02:53 IST

नागपूर जिल्ह्यात १५ जुलै २०१५ पर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना ६०६ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले आहे, ...

जिल्ह्यात ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे नागपूर : नागपूर जिल्ह्यात १५ जुलै २०१५ पर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना ६०६ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. नागपूर जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज वाटपाचे खरीप हंगामाचे ८४१.५० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६०६ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. सोमवार व शुक्रवार या दिवशी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या बैठका होत आहेत. यात बँकांचे अधिकारी , सहकार विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहतात. याशिवाय जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन पीक कर्ज शिबिरे घेण्यात आली. या शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच बँकासुद्धा कर्ज देण्यास उत्सुक आहेत. ज्या राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे त्यात अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन व युनायटेड बँक आॅफ इंडिया, विजया बँक, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, करुर वैश्य बँक, कर्नाटका बँक, रत्नाकर बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, एमएस को-आॅपरेटिव्ह बँक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने अधिक वाटप गेल्यावर्षी १५ जुलैपर्यंत केवळ ३३९२१ शेतकऱ्यांना २८५ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच मागील वर्षी संपूर्ण खरीप हंगामात ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत ५५,२६२ शेतकऱ्यांना ४७७ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु या वर्षी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे १५ जुलैपर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना तब्बल ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, हे विशेष.