शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापनासाठी महाराष्ट्रातील ६५ टक्के प्राध्यापकांकडून व्हॉट्सअ‍ॅपवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:28 IST

महाराष्ट्रातील सात विद्यापीठांमधील ८६ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन केले. विशेषत: ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करण्यावर भर दिला.

ठळक मुद्देसात विद्यापीठांतील सर्वेक्षणातून निष्कर्षअखेरच्या वर्षाच्या परीक्षाच विद्यापीठाने घ्याव्यातअर्ध्याहून अधिक प्राध्यापकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने यूजीसीने प्राध्यापकांनी ऑनलाईन अध्यापनावर भर द्यावा असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील सात विद्यापीठांमधील ८६ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन केले. विशेषत: ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करण्यावर भर दिला.सी.पी.अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अजय कुळकर्णी यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील चारशेहून अधिक प्राध्यापकांचा प्रामुख्याने समावेश होता. यात कला शाखेतील ६१ टक्के, वाणिज्यमधील ९.९ टक्के, तर विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखेतील १०.२ टक्के प्राध्यापक होते.अध्यापनासाठी इंटरनेट व सोशल मीडियावर विविध मंच उपलब्ध आहेत. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार ६५.९ टक्के प्राध्यापकांनी अध्यापनासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग केला. ११.६ टक्के प्राध्यापकांनी गुगल क्लासरूमचा तर ८.९ टक्के प्राध्यापकांनी यूट्यूूबचा वापर केला.प्राध्यापक स्वत:ही करताहेत ‘डिजिटल लर्निंग’अनेक प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अभ्यास ही नवीन संकल्पना आहे. त्यामुळे ८८.२ टक्के प्राध्यापकांनी दररोज १ ते २ तासांचा वेळ स्वयंअध्ययनासाठी घालविला. यातील ६४ टक्के प्राध्यापकांनी मूक, स्वयम्, मूडल इत्यादी माध्यमांतून डिजिटल लर्निंगवर भर दिला.ही संधी की आव्हान?सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती ही शैक्षणिक क्षेत्रासमोरील आव्हान असल्याचे मत ५५.३ टक्के प्राध्यापकांनी व्यक्त केले. तर ३७.५ टक्के प्राध्यापकांनी ही संधी असल्याचे म्हटले. ७.२ टक्के प्राध्यापक व्दिधा मन:स्थितीत असल्याचे दिसून आले.-असा असावा परीक्षा पॅटर्नलॉकडाऊनमुळे विद्यापीठांतील परीक्षादेखील पोस्टपोन करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात याव्या याबाबतदेखील विचारणा करण्यात आली होती. ३४.३२ टक्के प्राध्यापकांनी उन्हाळी परीक्षा रद्द करून अंतिम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळी परीक्षांसोबत घेण्यात याव्या असे मत व्यक्त केले. तर ५१.८५ टक्के प्राध्यापकांनी अंतिम वर्ष वगळता सर्व परीक्षा महाविद्यालयांनी घ्याव्या अशी भूमिका मांडली. २४.४४ टक्के प्राध्यापकांनी याला अंशत: सहमती दर्शविली.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र