शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ७ तर बुलडाण्यात ५ पॉझिटिव्ह; विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:17 IST

विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे.

ठळक मुद्देआणखी १२ रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. अकोल्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ तर बुलडाण्यात १७ झाली आहे. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे.विदर्भात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन नागपूरच्या मेडिकलमध्येही आता नमुने तपासणीला सुरुवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा आपल्या स्तरावर काम करीत आहे. लोकांनी यात सहकार्य करण्याचे व घरीच थांबण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यातील नमुने तपासणीची जबाबदारी असलेल्या नागपूरच्या मेयोमधील प्रयोगशाळेत बुधवारी रात्री अकोल्याचे १७ नमुने तपासण्यात आले. यातील ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला. याच प्रयोगशाळेत आज सकाळी पहिल्या दोन टप्प्यात तपासण्यात आलेल्या ४६ नमुन्यांमध्ये अकोल्यातील ९, मेडिकलमधील १७, मेयोतील १२, सेवाग्राम, गडचिरोली, अमावती व वर्धेतील प्रत्येकी १ व यवतमाळमधील ४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपूरच्याच आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) बुधवारी रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यात बुलडाण्याचे ३ तर गुरुवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नागपुरात आतापर्यंत १९, गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी १, अमरावती जिल्ह्यात ४, अकोला जिल्ह्यात ९, बुलडाण्यात १७ तर यवतमाळ जिल्ह्यात ११ रुग्णांची नोंद होऊन ही संख्या विदर्भात ६० वर पोहचली आहे. नागपूर, अमरावती व बुलडाण्यात प्रत्येकी एक मृत्यू आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नागपुरातील चार तर यवतमाळमधील तिघे आहेत.

- विदर्भातील कोरोनाची स्थितीजिल्हा                   एकूण पॉझिटिव्ह           यापैकी बरे झालेले                   मृत्यू

नागपूर                    १९                                       ४                                     १

बुलडाणा                  १७                                     ०                                       १

गोंदिया                      १                                       ०                                      ०

वाशिम                       १                                      ०                                       ०

अमरावती                     ४                                      ०                                   १

अकोला                       ९                                    ०                                       ०

यवतमाळ                 ११                                      ३                                      ०

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस