शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

६० दुकानांचे शेड तोडले

By admin | Updated: September 24, 2016 01:06 IST

नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी मानकापूर परिसरात कारवाई करीत ६० दुकानांचे अतिक्रमित शेड तोडले.

मानकापुरात कारवाई : हातठेला जप्त, घरांचे ओटे तोडले नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी मानकापूर परिसरात कारवाई करीत ६० दुकानांचे अतिक्रमित शेड तोडले. सकाळी ११.३० वाजता कारवाईला सुरुवात झाली. फरस चौक येथील किराणा दुकान, स्टेशनरीसह अनेक दुकानांचे रस्त्यापर्यंत आलेले शेड जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आले. यानंतर झेंडा चौक ते मंदिरापर्यंत कारवाई करण्यात आली. फरस चौकातच एका हॉटेलने बाहेरपर्यंत शेड तयार केले होते. त्यालाही तोडण्यात आले. याशिवाय दुकाने आणि घरांचे अतिक्रमित ओटे व जीनेसुद्धा तोडण्यात आले. चार दुकानांच्या लोखंडी शिडी हटविण्यात आल्यात. झेंडा चौकातच चिकन व फेब्रिकेशनचे अतिक्रमणही हटविण्यात आले. यावेळी काही स्थानिक नागरिकांसोबत वादही झाला. परंतु अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावर अनेक नागरिकांनी समर्थनही केले. यानंतर परत फरस चौकातील पूजा साहित्याच्या दुकानांचे शेड व साहित्य जप्त करण्यात आले. मानकापूर रोडवरील तीन अंडे व आम्लेट विक्रेत्यांच्या ठेल्यांवर कारवाई करण्यात आली. दोन हातठेले जप्त करण्यात आले. ही कारवाई नासुप्र अधिकारी रामभाऊ पाटील, हरिभाऊ उके, शाखा अभियंता राठोड, पथकप्रमुख वसंत कन्हेरे, भीमराव मगरे व पोलीस दलाने केली. (प्रतिनिधी)